| |

शास्त्रीयदृष्ट्या भुकेचा रागाशी काहीही संबंध नाही; जाणून घ्या रिसर्च रिपोर्ट

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो, भूक लागणे हि नैसर्गिक बाब आहे. जेव्हा शरीराला आवश्यक ऊर्जेची पूर्तता होत नाही तेव्हा भुकेची जाणीव होते. पण अनेकदा आपण पहिले असेल भूक लागली असताना वेळेत काही खायला मिळाले नाही तर त्या व्यक्तीची खूप चिडचिड होते. अश्यावेळी अनेकदा आपण मस्करीत म्हणून जातो तुला भूक लागलीये म्हणून तू राग राग करतोय किंवा करतेय. स्वाभाविकपणे भूक ही अशी गोष्ट आहे जी कुणाला, कधीही आणि कुठेही लागू शकते. पण चिडचिड करणाऱ्या लोकांना पाहून एक असा ग्रह निर्माण झाला आहे कि, जास्त राग आला की जास्त भूक लागते वा खूप भूक लागली कि जास्त राग येतो. मात्र शास्त्रीयदृष्ट्या राग आणि भूक यामध्ये काहीही परस्पर संबंध नाही असे काही तज्ञांच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तर चला जाणून घेऊयात काय म्हणतो रिसर्च रिपोर्ट:-

शास्त्रज्ञांच्या मते, भूक लागणं ही खरी आणि प्रामाणिक भावना आहे. तसेच भूक ही माणसातील नैसर्गिक भावना आहे. जेव्हा आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जेची गरज भासते तेव्हा साहजिक आपल्याला अन्नाची गरज भासते. त्या-त्या वेळी ही भावना सहजरित्या व्यक्त करणे काही दोष नाही. त्यामुळे ‘ मला भूक लागली आहे’ ही भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही स्थळाचं, वेळेचं वा अन्य कोणत्याही गोष्टीच बंधन असू नये. याशिवाय पोषण व आहारातील पथ्य या विषयाशी संबंधित तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यांचा रिसर्च रिपोर्ट सांगतो कि, ”राग आणि भूक यामध्ये काहीही संबध नाही. मात्र बदलत्या लाईफ स्टाईलने हा एक ग्रह निर्माण केला आहे.

भूक लागणं वा राग येणं या २ वेगवेगळ्या भावना जेव्हा उघड होतात तेव्हा आपल्या शरीरात होणारे रासायनिक बदल हे हार्मोन्स आणि मेंदूवर परिणाम करत असतात. या बदलांमुळे एकाच प्रकारच्या विविध संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मेंदूकडून तणावपूर्वक स्थितीमध्ये एकाच पद्धतीचे आदेश दिले जातात. याचा परिणाम म्हणजे राग आणि भूक दोन्हीची तीव्रता वाढते. म्हणून भुकेचा रागाशी संबंध जोडणे पूर्णतः चुकीचे आहे.