| |

बाळाच्या मजबूत आरोग्यासाठी रव्याची खीर लाभदायी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नुकतंच जन्माला आलेलं बाळ ठोस आहार घेऊ शकत नाही. सुरुवातीचे ६ महिने ते बाळ आपल्या आईच्या दुधावरच असते. कारण आईच्या दुधातून बाळाच्या शरीराचे पूर्ण पोषण होते. यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पचनसंस्था मजबूत नसते. यामुळे आईच्या दुधाशिवाय कोणताही पदार्थ बाळाला पचू शकत नाही. मात्र बाळ ६ महिन्याचे होऊन गेल्यानंतर त्याच्या प्राथमिक आहारात बदल करावा लागतो. ज्यामुळे त्याची बाळाची वाढ होत असते. हा आहार अतिशय पौष्टिक असायला हवा हे आपण सारेच जाणतो. पण हा आहार काय असावा याबाबत अनेक माता संभ्रमात असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला या लेखातून अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही बाळाला भरवल्याने त्याची वाढ मजबूत होते. हा पदार्थ म्हणजे रव्याची खीर. चला तर लहान मुलांसाठी रव्याची खीर कशी बनवायची ते जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० रव्याची खीर बनविण्यासाठी लागणारे साहित्य
– १ चमचा रवा,
– १ चमचा साखर,
– १/२ चमचा ड्राय फ्रुट्स पावडर,
– १ चमचा तूप
– २५० मिली दुध

कृती – सर्वप्रथम गॅसवर एक भांडे ठेवा आणि ते गरम झाल्यावर त्यात तूप टाका. तूप विरघळल्यावर त्यात रवा व्यवस्थित भाजून घ्या. आता यात ड्राय फ्रुट्स पावडर टाका. अजून थोडा रंग बदलल्यावर त्यात दुध घाला. दुध टाकल्यानंतर काही वेळ रवा व्यवस्थित शिजू द्या. आता रवा शिजला की त्यात साखर टाका. साखर टाकल्यानंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजूवा.
– जर तुमच्या बाळाला नुकतेच ६ महिने पूर्ण झाले असतील आणि तुम्ही त्याला पहिल्यांदाच रव्याची खीर भरवत असाल तर हे मिश्रण जास्त घट्ट करू नका. शक्य तितके पातळ ठेवा. ज्यामुळे बाळ ते सहज खाऊ शकेल.
– जर तुमचं बाळ मोठ असेल आणि त्याने ठोस आहार घेणे सुरु केले असेल तर तुम्ही त्याला घट्ट खीर भरवू शकता.

० आता जाणून घेऊ या खीरीमुळे बाळाच्या शरीराला काय फायदे होतात ते खालीलप्रमाणे:-

१) रव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आणि पोटॅशियम असते आणि यामुळे बाळाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर चांगला होतो.

२) रव्यात असणारे लोह बाळाच्या शरीरातील पेशींना मजबूत आणि सक्रिय करतात. यामुळे हृदय सुद्धा निरोगी राहते.

३) रव्यातील कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन ‘बी’, व्हिटॅमिन ‘ई’ आणि प्रथिने यांमुळे रव्याची खीर बाळासाठी पौष्टिक ठरते.

४) रव्याचा बाळासाठी मुख्य फायदा म्हणजे रवा सहज खाल्ला जाऊ शकतो. तो अगदी सहज पचतो आणि यामुळे बाळाला अपचन होत नाही.

५) रव्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियम कमी असल्याने बाळाला रवा खाल्लयने धोका नसतो.