| | |

गर्भवती महिलांसाठी शतावरी अत्यंत लाभकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आज आपण इतके प्रगत आणि अद्धुनिक झालो आहोत कि विज्ञानाने अनेको रोगांवर मात करण्यासाठी निरनिराळी औषधे आणि लसींचा शोध लावला आहे. पण तरीही अद्याप भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचे स्थान अव्वल आहे. कारण प्राचीन काळापासून आयुर्वेद एका परंपरेप्रमाणे जपलेला वारसा आहे. यात कित्येक औषधींची माहिती आणि उपयोग सांगण्यात आलेले आहेत. जे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत. त्यांपैकी एक म्हणजे शतावरी.

– शतावरी एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे. जी आपल्या नैसर्गिक लाभदायक गुणधर्मांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. शतावरीचा उपयोग अनेक औषधी बनवण्यासाठी केला जातो. हि औषधी तीन रंगांमध्ये आढळते. – पांढरा, हिरवा आणि जांभळा. शतावरी चा उपयोग अनेको शारीरिक समस्यांवर प्रभावीरीत्या काम करतो आणि आपल्याला आराम देतो. प्रामुख्याने शतावरी गर्भवती महिल्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठीही लाभदायक आहे. शतावरी मूळ स्वरूपात उपलब्ध नसली तरीही बाजारात शतावरी चूर्ण उपलब्ध असते. त्याचा तुम्ही वापर करू शकता. चला तर जाणून घेऊयात शतावरीचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) गर्भवती महिलांसाठी फायदेशीर – शतावरीमध्ये फोलेट असते. जे गर्भवती महिलेच्या शरीरात फोलेटची पूर्णतः करते. फोलेट हे एक असे आवश्यक पोषक तत्व आहे, जे गर्भवती महिलेसोबत तिच्या गर्भातील बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यास आवश्यक असते. यामुळे गर्भवती महिलांनी शतावरी, सौंठ, अश्वगंधा, ज्येष्ठमध व भूंगराज एकत्रित करून त्याचे चूर्ण बनवावे आणि हे चूर्ण १-२ ग्राम इतक्या प्रमाणात बकरीच्या दुधासोबत सेवन करावे. यामुळे गर्भाचे स्वास्थ्य उत्तम राहते. हे चूर्ण ५ ग्रॅम पेक्षा जास्त सेवन करू नये. याची विशेष काळजी घ्यावी.

२) स्तनदा मातांसाठी लाभदायक – अनेक महिलांमध्ये बाळंतपणानंतर स्तनात दूध न येण्याची वा कमी येण्याची समस्या असते. अश्या स्थितीत या मातांनी १० ग्रॅम शतावरी जड’चे चूर्ण दुधासोबत सेवन करावे. यामुळे त्यांच्या स्तनात दुधाची वृद्धि होऊ लागेल. त्यामुळे बाळंतपणानंतर महिलांनी शतावरीचे सेवन जरूर करावे.

३) शारीरिक क्षमता वाढवून लैंगिक समस्यांवर मात – ज्यांना शारीरिक कमजोरीचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी शतावरी उपयोगी आहे. कारण शतावरीच्या सहाय्याने शारीरिक ऊर्जेची उत्पत्ती होते आणि शरीर मजबूत होते. शिवाय या जडीबुटीच्या उपयोगाने लैंगिक क्षमता वाढवता येते. यासाठी दुधासोबत दररोज शतावरी चूर्ण सेवन करावे. यामुळे लैंगिक समस्याही दूर होते आणि शारीरिक क्षमतादेखील वाढते.

४) अनिद्रेवर प्रभावी – अनिद्रेच्या समस्येपासून त्रस्त असाल तर २ ते ४ ग्राम शतावरी चूर्ण दुधात गरम करून घ्यावे. यानंतर त्यात थोडे तूप घालून सेवन करावे. यामुळे अगदी सहज आणि गाढ झोप लागते.

५) मूत्र व किडनी रोगात शतावरी परिणामकारी – शतावरी एक नैसर्गिक मूत्रवर्धक औषधी आहे. जी शरीरातील मीठ मिश्रित तरल पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य करते. यामुळे किडनी संबंधित रोगांमध्ये शतावरी फायदेशीर ठरते. यासाठी १० ते ३० मिली शतावर जड’चा काढा बनवून त्यात मध आणि साखर मिश्रित करून प्या आणि बघा संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.

० अत्यंत महत्वाचे – शतावरी चूर्णाचे सेवन कसे करावे?
– शतावरी चूर्णाचे सेवन करण्यासाठी अश्वगंधा आणि शतावरी चूर्णचे १००-१०० ग्रॅम पॅकेट एकत्र करा. हे मिश्रण दररोज दिवसातून २ वेळा १ १/२ चमचा म्हणजेच ५ ग्राम पर्यंत गरम दुधासोबत सेवन करा. याचसोबत नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर निरोही तसेच मजबूत होईल.