मासिक पाळीच्या दरम्यान कोरोनाची लस घ्यावी कि न घ्यावी? या अफवेमागे काय आहे सत्य

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोना महामारीने अक्षरशः कहर केला आहे. दररोज कोरोनाने मरणाऱ्या लोकसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागलाय. प्रशासन आणि सरकार त्यांच्या पातळीवर अहोरात्र झटत आहेत. जनतेमध्ये जनजागृती करून योग्य ती खबरदारी घेऊन सर्वांनी यातून बाहेर पडण्याची धडपड चालू आहे. पण काही विघ्नसंतोषी लोकांच्याकडून सोशल मिडिया चा वापर करून विनाकारण अफवा पसरवणे चालू आहे. यामध्ये होते काय की सरकारच्या प्रयत्नाला खीळ बसत आहे. त्यातच आता नवीन अफवेची भर पडली आहे ती म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान कोरोनची लस घेऊ नये म्हणून. मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवसानंतर लसीकरण करु नये. कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी झालेली असते. लसीकरण हे सुरुवातीला आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करते आणि नंतर ते खूप झपाट्याने वाढवते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असते तेव्हा कोरोना लागण होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही खबरदारी घ्यावी.

कृपया ही माहिती आपल्या घरात, मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य सांगा…लसीकरणाला देऊ साथ… कोरोनावर करु मात…, असे यात म्हटले आहे. याबाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.वास्तविकता सुरवातीला 45 वर्षावरील नागरिकांना सरकारने लस देण्यास सुरुवात केली. पण कोरोनाच्या नवीन स्ट्रेन मुळे दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व जाणून 01 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्वांनाच लसीकरणाची मोहीम हाती घेतली. सर्व नागरिक है कोविड प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी cowin.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपल्या नावाची नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे. कोरोना विषाणूची दुसरी लाट देशभरात पहायला मिळत आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी भारत सरकारने लसीकरण (Vaccination program) मोहिमेचा अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2021 पासून देशभरातील वर्षांवरील सर्व नागरिक लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल message) होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे.

व्हायरल होणार मेसेज नेमका काय? सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, “महिलांनी मासिक पाळीच्या (periods) 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये.” व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळेच आता सरकारकडून यासंदर्भात अधिक माहिती आणि स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. Covid-19 Vaccine Free: महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देणार? पाहा अजित पवार काय म्हणाले Viral होणाऱ्या मेसेजमधील दाव्यात किती तथ्य? सरकारकडून सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोविड प्रतिबंधक लस घेऊ नये असा दावा करणारा मेसेज खोटा आहे. अफवांना बळी पडू नका.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा ट्विट करुन सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यातील माहिती खोटी असून मासिक पाळी सुरू असताना ल घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम हो नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका.