Smooth the face with the help of milk powder
|

दुधाच्या पावडरच्या साहयाने करा चेहरा नितळ

हॅलो आरोग्य ऑनलाईन । दुधाची पावडर हि आपल्या घरात वापरली जाते . वेगवेगळे पदार्थ बनवताना सुद्धा दुधाच्या पावडर चा वापर हा जास्त केला जातो. दूध हा आरोग्यसाठी खूप लाभकारक आहे. कमी वजन असलेले आणि जी लहान मुले आहेत त्यांना सुद्धा दुधाची पावडर हि दिली जाते . तसेच चहा मध्ये सुद्धा दुधाच्या पावडर चा वापर हा केला जातो. त्याव्यतिरिक्त तुम्हला धक्का बसेल असे दुधाच्या पावडर चे महत्व आहेत . आपल्या चेहऱ्याला चमक येण्यासाठी सुद्धा दुधाची पावडर हि मदत करते .

आपल्याला नैसर्गिक त्वचेला अजून मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी दुधाच्या पावडरच्या साहयाने वेगवेगळे स्क्रब करून आपल्या चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे चेहरा हा अजून गोरा दिसतो. जाणून घ्या कश्या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावर स्क्रब करू शकता.

— स्क्रब बनवा

आपण हे स्क्रब प्रमाणे देखील वापरू शकता. या साठी एका वाटीत २ मोठे चमचे दूध पावडर आणि १ लहान चमचा कॉफी पावडर आणि गरजेप्रमाणे नारळाचं तेल मिसळा. काही वेळ ते मिश्रण हे एकत्र करून ठेवा . त्यानंतरआपला चेहरा हा स्वच्छ पाण्याने धवून घ्या . थोडा चेहरा हा ओला राहिल्यानंतर त्याच्यावर पाच मिनिटे चेहऱ्यावर स्क्रब करा. काही मिनिटे स्क्रब तसेच ठेवा. नंतर चेहऱ्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.या मुळे मृतत्वचा स्वच्छ होते. त्वचेवरील अतिरिक्त तेल स्वच्छ होऊन मुरूम,डाग मुक्त होऊन गडद मंडळे कमी होऊ न नितळ आणि चमकदार त्वचा मिळते.

— सिरम म्हणून वापरा

आपल्या चेहऱ्यावर सिरम म्हणून सुद्धा वापर करू शकता. एका वाटीत काही प्रमाणात पावडर घ्या. त्याच्यामध्ये गुलाबपाणी मिक्स करा. त्याची जर पेस्ट बनली गेली असेल तर ते मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवा . त्यानंतर या मिश्रणाचा थर हा आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.कमीत कमी आठ्वड्यातवून दोनदा हा प्रयोग करा. म्हणजे तुमच्या नितळ त्वचेवर कोणत्याहि प्रकारच्या मुरूम किंवा डाग हे येणार नाहीत .

—- फेस मास्क बनवा

आपण जर चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर मात्र आपल्या सुदंर त्वचेला अजून टवटवीत पणा येण्यास सुरुवात होते . फेस मास्क तयार करताना एका वाटीत मिल्क पावडर घेऊन काही प्रमाणत हरभरा याची डाळ घ्यावी . त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकून ते सारे मिश्रण हे मिक्स करा. काही प्रमाणात मधाचे त्यामध्ये मिश्रण करा. आणि ते आपल्या चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हि अजून मुलायम बनते .