radish

आपल्या आहारात मुळे खाण्याचे काही फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात कधी कधी मुळी असलेल्या भाज्यांचा किंवा कंदमुळांचा वापर हा करतो. कधी त्याची भाजी बनवतो तर कधी सलाड किंवा कोशिंबीर च्या माध्यमातून त्याचा वापर हा आहारात करतो. पांढऱ्या रंगाचा असलेला मुळा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेच . तसेच खाताना त्याचा होणार आवाज हा क्रिस्पी असतो. त्यामुळे खाताना कुरुंकुरुम अजून मजा येते . मुळा हे फळ जमिनीच्या खाली येते. त्याचा समावेश हा साधारण ब्रोकोली आणि कंद या वनस्पतींच्या विभागात केला जातो. ते आरोग्यास गरज असलेले घटक देण्याचे काम करते .

मुळा यामध्ये इतर कंदमुळांच्या तुलनेत कमी प्रोटिन्स असतात . पण ते शरीराला प्रभावी असे प्रोटिन्स देतात. साधारण एक कप भरून जर मुळ्याचा रस घेतला तर मात्र ते आपल्याला जवळपास २० ग्रॅम कॅलरीज इतकी ऊर्जा देते. त्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला ४ ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट्स आणि काही ठरावीक प्रमाणात फायबर मिळते . त्याचा जर आहारात समावेश केला तर आपल्याला शरीरात फॅट्स मात्र तयार होत नाही . त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो . तसेच त्याच्यापासून व्हिटॅमिन सी, पोटॅशियम , फॉस्फेट असे घटक मिळतात.

मुळा मध्ये असलेले घटक इतके प्रभावी असतात , कि ते शरीरात असलेल्या कॅन्सर च्या घटकांना सुद्धा नष्ट करण्याचे काम करते. तसेच यांच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीचे सल्फर असते . मुळ्यामध्ये असलेली घटक हे हेलीकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरिया असे जे शरीरासाठी हानिकारक घटक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम करते . हे जे बॅक्टरीया आहेत ते अल्सर आणि पोट कर्करोगाशी जोडलेले आहेत. कर्करोगाच्या विरोधात लढण्यास मुळ्यातील बॅक्टरीया हे मद्त करतात.