Some tips to keep nails healthy
|

नखं निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स…

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या हातांची नखे जर खराब असतील तर त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्वात खूप मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला सुरुवात होते. आपले व्यक्तिमत्त्व जर छान दिसायचे असेल तर आपली नखे स्वच्छ आणि कापलेल्या अवस्थेत असले पाहिजे. जर तुमचे नखे जास्त प्रमाणात वाढली असतील तर पहिली नखे पहिली कमी केले पाहिजेत. नखे साफ करण्यासाठी आपल्याला बाजारात पेपर फायलर सॉफ्टनेसने काम करतं. त्याच्या सहाय्याने नखात वाढलेली घाण तुम्ही सहज रित्या कमी करू शकता. नखांची घाण काढताना तुम्ही घाई अजिबात करू नका. त्यामुळे नखे साफ न होता काही कण तसेच राहतात.

थोड्या कोमट पाण्यामध्ये हात घालून नखांना टूथब्रश अथवा एका नेलब्रशच्या सहाय्याने स्क्रब करून घ्या. लक्षात ठेवा की, तुम्हाला फक्त नखांच्या आतमध्येच नाही तर बाहेर आणि क्यूटिकल्ससुद्धा साफ करून घ्यायचे आहेत. यानंतर हात साबणाने नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि टॉवेलच्या मदतीने नखं नीट सुकवून घ्या. आता एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन कमीत कमी ५ मिनिटांपर्यंत तुमची नखं त्यामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर हात बाहेर काढून एक एक नख नीट साफ करून घ्या.

—- नखं वेळोवेळी कमी करा

इतक्या सगळ्या गोष्टी करण्याइतका वेळ तुमच्याजवळ नसेल आणि तुम्हाला तरीही आपलं नखं स्वच्छ ठेवायची असतील तर तुम्ही तुमची नखं जास्त वाढवू नका. त्याची उंची कमी ठेवा. कारण लहान नखं असल्यास, जास्त साफसफाई करत राहावी लागत नाही.

— नखांना मोकळा श्वास घेऊ द्या

त्याशिवाय तुम्हाला जर नेहमी नेलपॉलिश लावायची सवय असेल तर निदान एक आठवडाभर नखांवर नेलपॉलिश लाऊ नका. त्यामुळे तुमच्या नखांवर पिवळेपणा येणार नाही आणि नखं मजबूत राहतील.

— नखं चावण्याची सवय धोकादायक

तुम्हाला जर नखं चावायची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे केवळ तुमची नखंच खराब होत नाहीत तर त्यामध्ये गेलेल्या किटाणू अर्थांत जर्म्सचा परिणाम तुमच्या शरारीवर होत असतो हे लक्षात घ्या. नेलपॉलिश काढल्यानंतर नेहमी नखांना लिंबू लावा. ते विसरू नका. त्यामुळे नखे पांढरीशुभ्र राहण्यास मदत होते. आता हात सुकवून त्यावर मॉईस्चराईजर लावा. आवश्यक असल्यास, नखं नेलकटर अथवा नेलक्लिपरच्या सहाय्याने कापून घ्या. त्यामुळे वाढलेल्या नखांमध्ये घाण साठण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.