| |

काही चुकीच्या सवयी करतात हृदय कमजोर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीर निरोगी ठेवायचं असेल तर अंगी चांगल्या सवयी असणं अतिशय गरजेचं आहे. कारक अनेक धोकादायक रोग कमी वयात आपल्या शरीरात घर करण्याचे कारणंच आपल्या सवयी आहेत. जसे कि व्यायाम न करणे, जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळणे, काहीही खाणे, अतिशय धूम्रपान आणि मद्यपान करणे या सवयी आरोग्याचे नुकसान करणाऱ्या आहेत. यांचा परिणाम अनेक गंभीर आजारांच्या स्वरूपात भोगावा लागू शकतो. तज्ञांच्या मते, अश्या सवयींमुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि पोषणाची कमतरता जाणवते. यासह, व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह, तणाव, नैराश्य, शारीरिक वेदना इ. समस्या जाणवू शकतात.

१) चुकीच्या वेळी चुकीच्या पदार्थांचे सेवन करणे.
परिणामी हृदयविकार – हृदय आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना निरोगी रक्त पुरवण्याचे कार्य करते. जर त्याचे कार्य विस्कळीत झाले तर शरीरावर निश्चितच याचा वाईट परिणाम होतो. तज्ञ सांगतात कि, जे लोक दररोज कार्डिओ किंवा एरोबिक व्यायाम करतात, त्यांचे हृदय निरोगी असते आणि त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो.

२) व्यायाम करण्याचा कंटाळा करणे.
परिणामी कमकुवत स्नायू – स्नायू कमकुवत होतात तेव्हा शारीरिक क्रिया करणे खूप कठीण होते. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि लवचिक ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम न केल्याने स्नायूंची वाकण्याची क्षमता आणि लवचिकता कमी होत नाही तर त्यांच्याकडे येणारा रक्त प्रवाह देखील कमी होतो.

३) कमीतकमी पाणी पिणे.
परिणामी शारीरिक थकवा – जे लोक कमी पाणी पितात त्यांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते आणि परिणामी शारीरिक थकवा जाणवण्याची समस्या होते. त्यांच्या शरीरात तग धरण्याची क्षमता आणि सहनशक्ती कमी होते. शिवाय चालताना दम लागणे, धाप लागणे, छोटी-मोठी कामे करताना थकवा येणे यासारख्या समस्या होतात.

४) डिजिटल स्क्रीनचा अति वापर करणे.
परिणामी निद्रानाश – रात्री उशिरापर्यंत जागरण किंवा डिजिटल स्क्रीनचा वापर करण्यामुळे झोपेवर याचा परिणाम होतो. ज्यामुळे शरीर स्वतःला तंदुरुस्त आणि रीफ्रेश करण्यास अक्षम होते. त्यामुळे निद्रानाश, ताण – तणाव आणि चिडचिड वाढते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *