| | |

आंबट गोड किवी देते आरोग्यवर्धक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। किवी हे एक सौम्य आंबट आणि तितकेच गोड चवीचे फळ आहे. या फळाचा ज्यूस प्यायल्याने शरीराचा अनेक समस्यांपासून बचाव होतो. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट, पोटॅशियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात असतात. इतकेच नव्हे तर तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किवीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाणदेखील सर्वांत जास्त असते. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण संतुलित राहते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय किवीच्या मदतीने आपले शरीर अनेक रोगांच्या विषाणूंचा सामना करण्यास सक्षम होते. म्हणूनच जाणून घेऊयात किवी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे कोणकोणते आहेत.

१) रक्तदाबावर नियंत्रण – किवीच्या रसात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. शिवाय कीवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदयासाठी ते फायदेशीर ठरते आणि रक्तदाबावर नियंत्रण राखता येते.

२) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – किवीतील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कीवीमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत करून घातक विषाणूंना रोखतात. याव्यतिरिक्त किवीत व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड, पॉलिफेनोल आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे कित्येक आजारांपासून रक्षण होते.

३) वजनावर नियंत्रण – लठ्ठपणाच्या समस्येवर किवी अतिशय लाभदायक आहे. कारण, किवीच्या रसात अँटी ऑक्सिडेंट, एंटी – इंफ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. जे लठ्ठ्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.

४) बद्धकोष्ठता – पोटाच्या कोणत्याही समस्यांवर किवी अत्यंत लाभदायी आहे. कारण पचन तंत्रासाठी किवीत आढळणारी पोषक तत्त्वे कमी येतात. यात पोटाच्या समस्या दूर झाल्यानंतर साहजिकच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

५) गर्भवती महिलांसाठी लाभदायक – किवीमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिड असते. जे गर्भवती महिलांसाठी व त्यांच्या बाळांसाठी गुणकारी ठरते. त्यामुळे कीवी स्वर्गीय फळापेक्षा काही कमी नाही.

६) मधुमेह – किवीमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत. सोबतच रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे घटक देखील त्यात समाविष्ट आहेत. किवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर लवकर वाढत नाही. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मुधमेहाचा त्रास होत नाही.

७) कॅन्सर – किवीच्या फळामध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करणारे घटक असतात. हे अँटी कॅन्सरचे गुणधर्म कॅन्सर विषाणू दूर ठेवतात. यासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा किवी खावे.

८) त्वचेच्या समस्या – किवी फळ नियमित खाल्ल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ निघून जाण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा चमकदार होते आणि कमी वयात सुरकुत्या येत नाहीत. शिवाय किवीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. तसेच किवीतील अँटी ऑक्सिडेंटमुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्याही कमी होते.