| |

सोयाबीनचे फायदे तसे तोटेसुद्धा आहेत; माहित नसतील तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सोयाबीनमध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे प्रोटिन्सने परिपूर्ण असतात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रोटीन मिळवण्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो. शिवाय सोयाबीनपासून टोफू आणि सोया मिल्क बनवतात. ज्याचा शरीराच्या वाढीसाठी लाभ होतो. त्यामुळे सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीनपासून बनवलेले इतर पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.

सोयाबीनमध्ये प्रोटिन्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते. शिवाय मधुमेहींसाठी सोयाबीनचे तेल खूपच फायदेशीर ठरते. एवढंच नव्हे, तर सोयाबीन खाण्याने मासिक पाळीच्या समस्यादेखील दूर होतात. मात्र सोयाबीन कधीच कच्चे खाऊ नये. याचे शरीराच्या आरोग्यास तोटे होऊ शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला सोयाबीनचे काही फायदे तर काही तोटे सांगणार आहोत.

० सोयाबीन खाण्याचे फायदे –

१) ह्रदयाच्या आरोग्यात सुधार – ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल गरजेइतके असणे आवश्यक असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. मात्र सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ज्याचा ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी फायदा होतो. करणं सोयाबीनमध्ये असणाऱ्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात वापर करावा.

२) मधुमेहींसाठी फायदेशीर – मधुमेहींना अनेकदा हे खाऊ का नको? असे प्रश्न पडत असतात. कारण त्यांच्या रक्तातील साखर वाढली तर त्याचा परिणाम थेट ह्रदय, किडनी आणि अगदी मेंदूवर होतो. पण सोयाबीन खाण्यामुळे मधुमेंहीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शिवाय कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे मधुमेहींनी सोयाबीन पासून बनवलेल्या पोळ्या खाव्या किंवा गव्हात सोयाबीन मिसळून दळलेले पीठ पोळ्यांसाठी वापरावे.

३) एनिमियावर परिणामकारक – एनिमियामुळे आज अनेक लोक त्रस्त आहेत. मात्र अशा लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्ल्यास चांगला फायदा होतो. कारण त्यामुळे शरीरातील लाल रक्त पेशी वाढतात शिवाय हाडेही मजबूत होतात. त्यामुळे शरीराचा विकास करण्यासाठी सोयाबीन चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे मांसपेशी, नखं, हाडे आणि अगदी केसही मजबूत होतात.

४) मासिक पाळीच्या समस्येपासून आराम – सोयाबीन खाण्याने मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात. महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी कमी झाली कि, त्यांना अंगदुखी सारखे अनेक त्रास जाणवतात. मात्र सोयाबीनमुळे शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी संतुलित राहते. त्यामूळे ज्या महिलांना मासिक पाळीत अंगमेहनतीची कामे करावी लागतात. अशा महिलांच्या आहारात सोयाबीन असणे फायद्याचे असते.

५) सोयाबीन दुधाचा हाडांना लाभ – सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी याची शरीराला गरज असते. ज्या लोकांना आर्थ्राटीस सारखे हाडांचे कोणतेही गंभीर विकार आहेत. त्यांनी आहारात सोयाबीनचा वापर केल्यास आराम मिळतो. शिवाय सोयाबीनमध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही.

० सोयाबीन खाण्याचे तोटे –

१) कोणत्याही गोष्टीचे आहारात अधिक सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. सोयाबीनचेही अधिक प्रमाणात सेवन करणे शरीरास नुकसानदायी असते.

२) गरोदर अथवा स्तनपान देणाऱ्या नवमाता यांनी डॉक्टरांच्या सल्लानुसारच सोयाबीनचे सेवन करावे.

३) सोयाबीनमुळे स्पर्म काऊंट कमी होण्याची शक्यता असते. त्यामूळे बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर सोयाबीनचा आहारात कमी वापर करा.