| |

टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसाल तर आयुष्य कमी होईल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना सकाळी जाग आल्या आल्या टॉयलेटला ची सवय असते. पण झोपेत टॉयलेटला गेलेल्या या व्यक्ती तासनतास टॉयलेट सीटवर अश्याच बसून राहतात. याशिवाय अनेकांना टॉयलेट सीटवर बसून पेपर वाचण्याची आणि अगदी आरामात मोबाइल वापरण्याचीही सवय असते. काही जण तर अक्षरशः टॉयलेट सीटवर बसून झोपतात. थोडे हास्यास्पद वाटले तरीही हे सत्य. अनेकांना या सवयी असतात. जर तुम्हालाही या सवयी असतील तर.., सावधान! कारण या सवयी तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. मुख्य म्हणजे याच सवयी तुमचे आयुष्यमान घटण्यास कारणीभूत असतात. याबाबत डॉक्टर सांगतात कि, ज्या व्यक्ती १० मिनिटांपेक्षा अधिक काळ टॉयलेट सीटवर बसून राहतात, ते त्यांचं आरोग्य धोक्यात घालत आहेत. याची कारणे स्पष्ट करताना त्यांनी काही विशेष बाबी सांगितल्या आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) अशा व्यक्तींमध्ये मूळव्याधीची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या आजाराला Hemorrhoids म्हणतात. या आजारात मांसाचा एक तुकडा गुदद्वाराजवळून बाहेर येतो आणि यामुळे खूप वेदना होतात. जी व्यक्ती १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसते तिचे पोट व्यवस्थित साफ होत नाही हे स्पष्ट होते.

२) पॉट व्यवस्थित साफ होत नसल्यास संबंधित व्यक्तीला जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून प्रेशर द्यावं लागतं. परिणामी त्या जागी असलेल्या ऊतींचं (Tissue) नुकसान होतं.

३) प्रत्येक व्यक्तीच्या गुदद्वारावर एक पडदा असतो. हा पडदा एखाद्या व्यक्तीला अवेळी शौचास जाण्यापासून रोखतो. जेव्हा तुम्ही अधिक काळ टॉयलेट सीटवर बसून राहता, तेव्हा या पडद्यावर ताण येतो, त्यामुळे तो पंक्चर होतो. यामुळे गुदद्वारातून रक्तस्रावदेखील होऊ शकतो. त्यामुळे १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसणं टाळा.

४) जितका जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसाल तितकं रक्त वाहिन्यांचं (Blood Vessels) अधिक नुकसान होत. कारण आपण ज्या स्थितीत बसून राहतो त्या स्थितीत रक्तवाहिन्यांवर ताण येत असतो.

उपाय – असा त्रास असणाऱ्या संबंधित व्यक्तींनी त्यांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल आणि जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहण्याची गरज भासणार नाही.

महत्वाचे – जर तुम्हाला १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसण्याची सवय असेल तर ती तुमच्यासाठी घातक आहे. कारण प्रसंगी शस्त्रक्रियेची गरज तुम्हाला भासू शकते. या शस्त्रक्रियेची तीव्रता सहन न झाल्यास आयुष्यमानावर याचा परिणाम निश्चित होऊ शकतो. त्यामुळे पोट साफ राहील याकडे अधिक लक्ष द्या.