|

देशात सौम्य संसर्गासोबत ओमिक्रॉनचा फैलाव; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोना विषाणूचा कहर अद्याप संपलेला नाही. तर आता देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा फैलाव वाढू लागला आहे. मुख्य म्हणजे आता देशात अगदी सौम्य संसर्गांसोबत ओमिक्रॉनचा विषाणू जगभरात वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे या धोक्याबाबत सतर्कता निर्माण करणे आता आणखी गरजेचे झाले आहे. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा तज्ञांनी केला आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटले आहे कि, सध्या सुरु असलेल्या लसीकरणामुळे या संसर्गावर नियंत्रण आणता येईल. मात्र जे लोक लसीकरणाला विरोध करीत लास घेत नाहीत अशा लोकांना या संसर्गाचा तीव्र धोका आहे.

याविषयी आणखी माहिती देताना संशोधकांनी सांगितले कि, ओमिक्रॉन लसीकरण झालेल्या वा पूर्वी संसर्ग झालेल्या लोकांमध्ये कमी पसरेल. तर जे लस घेत नाहीत त्यांना याचा धोका जास्त आहे. कोरोनाची महामारी अजून संपलेली नाही. त्यामुले लवकरच एंडेमिक स्टेजला सामोरे जावे लागेल. एंडेमिक स्टेज म्हणजे, व्हायरस एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी राहतो. तसेच ओमिक्रॉन सध्या अंतिम टप्प्यात आहे असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र संशोधक तज्ज्ञांच्या मताशी सहमत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, देशात ओमिक्रॉनचे सुमारे ५०० हून अधिक केसेस आहेत. त्यातील ११५ रुग्ण बरे झाले आहेत.

याविषयी अधिक बोलताना तज्ञांनी सांगितले कि, कोणताही व्हायरस नियंत्रणाबाहेर गेला कि तो माणसांच्या आरोग्यासाठी धोकादायकच असतो. जसे कि आपण पाहू शकतो, देशात दिवसागणिक ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय. देशातील १७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला असून देशभरात ओमिक्रॉनने बाधित असणाऱ्या रूग्णांची संख्या उच्चांक गाठताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरच आता हा विषाणू सौम्य राहिलेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आणि कोरोना प्रतिबंधित लस टोचून घेत नियमावलीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.