| |

पोट साफ होत नाही? तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण म्हणजे पोट साफ न होणे. बदलत्या जीवनशैलीतील ही एक सामान्य समस्या आहे आणि या समस्येने ट्रस्ट होण्यासाठी विशेष वयोगटाची गरज नाही. हि समस्या उदभवण्यामागे मुख्य कारण म्हणजे चुकीच्यावेळी चुकीचे खाणे, पाणी कमी पिणे, झोपण्याच्या वेळेत सतत बदल होणे. पण यामुळे अख्खा दिवस अगदीच त्रासदायक आणि अस्वस्थ होतो. त्यामुळे पॉट साफ होणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. या उपायांच्या सहाय्याने आपले संपूर्ण पोट स्वच्छ होईल आणि दिवसाची सुरुवात व्यवस्थित होईल.

१) कोमट पाणी – दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास वा एक तांब्या कोमट पाणी प्यायल्यास पोट स्वच्छ करण्यात सहाय्यता मिळते. एका संशोधनानुसार गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करून पचनशक्ती वाढवते.

२) मीठ आणि कोमट पाणी – सकाळी उठल्यावर जेव्हा आपले पोट रिकामी असेल तेव्हा हा उपाय करा. यासाठी
० साहित्य – एक पेला कोमट पाणी, १ चमचा मीठ
० कृती – पेलाभर कोमट पाण्यात मीठ व्यवस्थित मिसळून घ्या आणि मिठ पाण्यात विरघळपवार हे पाणी प्या. अधिक चांगला निकाल हवा असल्यास २ ग्लास पाणी प्या.
– गरम पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने आतड्यांची चांगली स्वच्छता होते व शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

३) मध आणि लिंबू पाणी – मध आणि लिंबू हे दोन्ही पदार्थ शरीरास घटक असणारे पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हा उपाय पॉट साफ करण्यासाठी उत्तम मानला जातो.
० साहित्य – १ ग्लास कोमट पाणी, १/२ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध, चिमूटभर मीठ
० कृती – ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस, मीठ आणि मध घालून व्यवस्थित ढवळून हे पाणी रिकाम्या पोटी दररोज सकाळी प्या.
– लिंबातील औषधी गुण पोटाला साफ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय लिंबातील ऍसिड पोटातील मळ साफ करते आणि विटामिन सी वाढवते. तर मध शरीरातील बॅक्टेरियल संतुलन निर्माण करते. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते.

४) ओवा – ओवा हा पोट साफ कारण्यासाठी वापरला जाणारा अगदी जुना उपाय आहे. आजीच्या बटव्यातही याचे विशेष महत्व आहे.
० साहित्य – १ चमचा ओवा पावडर, १ चमचा जिरा पावडर, १/२ चमचा अद्रक पावडर
० कृती – ओवा पावडर, जिरा पावडर आणि अद्रक पावडर एकत्रित मिसळून घ्या. यानंतर हे चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ हलक्या गरम पाण्यात मिसळून प्या. याशिवाय जेवणानंतर काही प्रमाणात ओवा हातावर चोळून थेट खाणेदेखील फायद्याचे ठरते.
– या उपायामुळे पोटाची समस्या आणि पोटातील जंतू नष्ट होतात. आतड्यांमध्ये असलेले प्यारासाइट्स बाहेर निघतात व पचनक्रिया वाढते.

५) एरंडेल तेल – एरंडेल तेलाचा प्रयोग देखील पोट साफ करण्यासाठी लाभदायक ठरतो.
० साहित्य – १/२ चमचा एरंडेल तेल, १/२ चमचा लिंबू रस
० कृती – एरंडेल तेल व लिंबू रस एकत्रित करा आणि रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण प्या. एकावेळी १ चमचा इतक्याच प्रमाणात याचे सेवन करावे. या मिश्रणाचे अधिक सेवन जुलाबाची समस्या निर्माण करू शकतात. याशिवाय दररोज रात्री १ चमचा एरंडेल तेल पिऊ शकता.
– एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी गुणकारी आहे. कारण यात लैक्सेटिव गुणधर्म असतात जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात.

० महत्वाचे – पोट साफ न होणे अनेक गंभीर समस्यांचे कारण असू शकते. त्यामुळे वरील कोणत्याही उपायाने फरक पडला नाही तर डॉक्टरांशी संपर्क जरूर साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.