| | | |

फंगल इन्फेक्शनचा खात्मा करण्यासाठी जबरदस्त घरगुती उपाय; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अनेको लोकांमध्ये फंगल इन्फेक्शनचे त्रास दिसून येत आहेत. सर्वसाधारणपणे त्वचेच्या ज्या भागात ओलसरपणा किंवा अधिक उष्णता असते तिथे या जिवाणूंचा संसर्ग होतो. यामुळे नायटा किंवा गजकर्ण अश्या रोगांची लागण होते. या संसर्गामध्ये गोलाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे आणि पुरळ त्वचेवर दिसून येतात. या चट्टय़ाच्या गोलाकार भागात बारीक फोड येतात आणि त्यांना प्रचंड खाज येते. विशेष करून घाम किंवा ओलसरपणा असणारा मांडीचा भाग, जांघ तसेच महिलांमध्ये छातीच्या खालील भाग अश्या ठिकाणी हे संसर्ग आढळून येतात. मात्र आजकाल याचे प्रमाण इतके वाढले आहे कि, अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा संसर्ग दिसत आहे.

कंबर किंवा जांघेसारख्या भागात संसर्ग झाल्यास डॉ-क्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटणे साहजिक आहे. यामुळे अनेकदा घरातील ज्येष्ठ वा मित्रमंडळींच्या सल्ल्याने औषधे घेतली जातात. पण तरीही हा संसर्ग बरा होत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्पे आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ज्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि शिवाय तुम्हाला आरामदेखील मिळेल.

१) आवळा खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात हे आपण जाणतो. तसेच खाज दूर करण्यासाठी आवळ्याची बी जाळून त्याची बारीक पावडर करून घ्या आणि त्यामध्ये नारळाचे तेल मिसळून खाज येत असलेल्या भागावर लावा. यामुळे त्या भागातील खाज दूर होईल आणि आराम मिळेल.

२) फंगल इन्फेक्शनमुळे सतत येणारी असह्य खाज रोखण्यासाठी, राईच्या तेलामध्ये चुना आणि पाणी मिसळून त्याचे मिश्रण बनवून घ्या आणि खाज येत असलेल्या भागावर हलक्या हाताने लावा. हे मिश्रण लावल्यावर थोडे झोंबेल पण खाज दूर करण्यासाठी मदत होईल.

३) आयुर्वेदात विशेष महत्व असलेला ओवा अगदी १०० ग्रॅम घेऊन पाण्यात उकळा आणि जेथे-जेथे खाज येते तेथे याचे पाणी लावा. याच सोबत पाण्यामध्ये ओव्याची पूड मिसळून खाज येणाऱ्या जागेवर लावा. यामुळे लवकर आराम मिळेल.

४) संसर्ग झालेल्या जागेवर आंबट दही लावावे. यामुळे जांघांच्या मध्ये खाज येत असेल तर ती दूर होण्यास मदत होते. कारण दह्यामध्ये खाज दूर करण्याचे गुणधर्म उपलब्ध असतात, ज्यामुळे फंगल इन्फेक्शनवर मात मिळवता येते.

५) एका लिंबाचा रस केळ्यामध्ये मिसळून खाजेच्या ठिकाणी लावल्याने खाज नाहीशी होते. शिवाय हा उपाय वापरल्याने गुप्तअंगी आलेले डाग नाहीसे होण्यास मदत मिळते.

६) गाईचे तूप ज्यात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. हे तूप आंबट , तिखट आणि उष्ण असते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचा रोगांवर हे उपायकारक असते. त्यामुळे संसर्गामुळे खाज येणाऱ्या जागेवर गाईचे तूप लावावे यामुळे आराम मिळतो.

७) तसेच अकरा वर्षे जुन्या गायीच्या तूपाला ‘महाघृत’ म्हणतात. हे गायीचे तूप जेवढे शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे, तेवढेच अन्य आजारावर गुणकारी आहे. यासाठी काळीमिरी, मुरदाशंख आणि कलईवाले नौसादर प्रत्येकी १० ग्रॅम घेऊन बारीक करून घ्या. यानंतर या मिश्रणात गायीचे तूप घालून ते एकजीव करून घ्या. हि पेस्ट तयार झाल्यानंतर ३-४ वेळा लावा. यामुळे कोणताही त्वचेचा विकार काही दिवसात नष्ट होईल.