Sugarcane Juice Benefits in Marathi
|

Sugarcane Juice Benefits: फक्त 1 ग्लास उसाचा रस प्यायल्याने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Sugarcane Juice Benefits सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाची गाडी दिसते. रखरखत्या उन्हात शरीराला आणि घशाला थंडाव्याची गरज असेल आणि समोर उसाचा रस दिसेल तर हा मोह आवरायचा तरी कसा..? यामुळे सर्रास गरमीच्या दिवसात उसाचा रस आवडीने प्यायला जातो. हा उसाचा रस फक्त शारीरिक थंडाव्यासाठी नव्हे तर इतरही आरोग्यदायी फायद्यांसाठी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे ताई, माई, अक्का.. विचार करा पक्का.. आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी उसाच्या रसावर मारा शिक्का… तर फायदा होईल पक्का.. आज आपण या लेखाच्या माध्यमातून उसाच्या रसाचे फायदे जाणून घेणार आहोत.

sugarcane juice

आपल्याकडचा उन्हाळा काहीसा तीव्र असतो. ज्यामुळे शारीरिक, मासिक आरोग्यासह आणि सौंदर्याचीदेखील पुरती वाट लागते. दरम्यान उष्णतेमुळे शरीराचे निर्जलीकरण झाल्यास इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात ते वेगळंच. या अशा परिस्थितीत चहा कॉफीऐवजी थंडगार उसाचा रस पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उसाचा रस हा केवळ शरीराला थंडावा देत नाही तर शरीराचे तापमान संतुलितकरतो. याशिवाय उसातील अनेक पोषक गूण हे शरीराचे इतर आरोग्य समस्यांपासून रक्षण करतात. शिवाय उसाचा रस एका प्रकारे एनर्जी बूस्ट ड्रिंक असल्यासारखा प्रभाव करतो. ज्यामुळे अधिक ताजेतवाने वाटते. यासाठी १ ग्लास ताज्या उसाच्या रसात थोडेसे काळे मिठ टाकून प्या. यामुळे शरीराला जास्त फायदा होतो. (Sugarcane Juice Benefits)

उसाचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे
Sugarcane Juice Benefits

strong men

१) एनर्जी बुस्टर – उसाचा रस शरीराचे निर्जलीकरण दूर करतो आणि शारीरिक ऊर्जा बूस्ट करतो. शिवाय आपल्या शरीराचे तापमान देखील कमी करून अंतर्गत थंड प्रभाव देतो. उसाच्या रसातील नैसर्गिक शर्करा शरीराद्वारे सहजपणे शोषली जाते आणि कमी साखरेची पातळी भरून काढण्यासाठी वापरली जाते. शिवाय नियमित फक्त १ ग्लास उसाचा रस प्यायल्यानंतर एनर्जी लेव्हल हाय होते आणि अख्खा दिवस उत्साही जातो. (Sugarcane Juice Benefits)

२) कँसरविरोधी – उसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मॅंगनीजचे उच्च प्रमाण असते. तसेच उसाचा रस क्षारीय असतो आणि कर्करोगाशी लढण्यास मदत होते. उसाच्या रसामध्ये असणारे फ्लेव्होनॉइड्स शरीरातील कर्करोगाच्या पेशींची उत्पत्ती रोखतो, विशेषतः प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग टाळण्यास मदत करतो.

Digestion

३) पचनासाठी फायदेशीर – आयुर्वेद सांगतो की उसाचा रस रेचक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच उसाचा रस पचनसंस्था तंदुरुस्त ठेवतो आणि पोटातील संसर्ग टाळतो. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच उसाचा रस पाचक प्रणाली व्यवस्थित ठेवतो आणि पोटॅशियम पोटातील पीएच पातळी संतुलित करतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. (Sugarcane Juice Benefits)

४) यकृतासाठी लाभदायी – यकृतसंबंधित कोणत्याही सौम्य असो वा गंभीर आजारांवर उसाचा रस हा एक उत्तम आणि नैसर्गिक उपचार मानला जातो. शिवाय उसाचा रस हा अल्कधर्मी असल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतो.

Diabetes

५) मधुमेहींसाठी उपयुक्त – उसात नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेहींसाठी तो त्रासदायी ठरत नाह. मात्र ऊसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे नियमित हा रस पिणे मधुमेहींनी टाळावे. शिवाय कधीतरी (Sugarcane Juice Benefits) उसाचा रस पिताना मधुमेहींना थोड्या प्रमाणात हा रस पिणे फायद्याचे ठरेल. मुख्य म्हणजे उसाच्या रसात नैसर्गिक साखरेमध्ये कमी ग्लायसेमिक निर्देशांक असतो. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वारंवार वाढ होण्यास प्रतिबंध होतो. त्यांउळे उसाचा रस मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.

Kidney Stone

६) किडनीचे आरोग्य राखते – उसाचा रस हा नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करतो. शिवाय संतृप्त चरबीशिवाय कमी- सोडियम उत्सर्जित करतो. ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुव्यवस्थित चालते. शिवाय किडनीचे आरोग्य राखल्यामुळे इतर समस्या होण्याची शक्यता कमी होते.

Bones

७) दात आणि हाडांचा निरोगी विकास – आपल्या भारतातील अनेक खेड्यापाड्यात उसाची मोठी शेती होते. यामुळे उन्हाळ्यात उसाच्या (Sugarcane Juice Benefits) काड्या गतकाळातील निरोगी नाश्ता म्हणून चघळला जात असे. याचा खरतर दातांसाठी फार लाभ होतो. कारण उसाचा रस पिणे वा उसाच्या काड्या चघळल्यामुळे कॅल्शियमयुक्त फायदे होतात. परिणामी हाडे आणि दातांचा योग्य विकास होण्यास मदत होते.

Breath

८) श्वासाची दुर्गंधी दूर होते – उसाच्या रसातील कॅल्शियम जसे दात मजबूत करण्यास मदत करते. तसेच उसाच्या रसातील इतर पोषक तत्व श्वासाच्या दुर्गंधीवर मात करण्यास मदत करतात.

९) वजन कमी होते – (Sugarcane Juice Benefits) ऊसाचा रस पिण्यामूळे वजन कमी करण्यास मदत होते. उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. तसेच उसाच्या रसात नैसर्गिक साखर असते जिचे सेवन केल्याने वजन वाढत नाही. याशिवाय उसाचा रस आतडे साफ करून चयापचय वाढवतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी उसाचा रस पिणे फायदेशीर आहे.

Skin

१०) त्वचेसाठी फायदेशीर – उसाच्या रसातील ग्लायकोलिक ऍसिडसारखे अल्फा- हायड्रॉक्सी ऍसिड (AHAs) मांसपेशींना सक्रिय बनवितात. हे गुणधर्म AHAs त्वचेला एक्सफोलिएट करतात. तर मुरुम तयार होऊ देत नाहीत. यासाठी फक्त मुलतानी माती उसाच्या रसात मिसळून याचा एखाद्या मास्कसारखा वापर करावा. हा मास्क साधारण २० मिनिटे असाच चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. असं आठवड्यातून किमान एकदा केल्यास मुरुमांची समस्या दूर होते. (Sugarcane Juice Benefits)

‘हे’ पण वाचा :-

आला उन्हाळा; तब्बेत सांभाळा…’या’ रसाचा समावेश करा आणि राहा थंडा थंडा, कुल कुल!!!

खिशात कांदा ठेवल्यावर रखरखत्या उन्हातही थंड वाटतं? जाणून घ्या यामागचं खरं लॉजिक