Sugarcane Juice Benefits in Marathi
| | | |

आला उन्हाळा; तब्बेत सांभाळा…’या’ रसाचा समावेश करा आणि राहा थंडा थंडा, कुल कुल!!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन । नेहमीच येतो उन्हाळा प्रत्येकाने आपआपली तब्बेत मात्र सांभाळा! कारण उन्हाळ्यात शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते आणि जास्त पाणी पिऊन पचनसंस्था कमजोर होऊन भूक मंदावते. अशा वेळी थंडगार, मस्तमस्त, गोड गोड असे काहीतरी प्यायची इच्छा निर्माण होते. बाजारात अनेक सोडायुक्त बाटलीबंद पेये चटकन मिळतात. पण त्यामध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण, सोडा, कृत्रिम रसायने यामुळे याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होतो. रस्त्याच्या शेजारी रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज ऐकला कि पावले आपोआप तिकडे वळतात. एक ग्लास गोड मधुर चवीचा थंड थंड रस पोटात गेल्यावर शरीरासोबत मनालाही शांती मिळते आणि मन तृप्त होऊन जाते. उन्हाळ्यात उसाचा ताजा थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाच्या रसात लिंबू, आले आणि काळे मीठ घातले तर याची चव द्विगुणीत होते. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. त्यामुळे फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव होत नाही तर उष्माघात आणि इतर बऱ्याच आजारापासूनही दूरही ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते. Sugarcane Juice Benefits in Marathi

उसाच्या रसाचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे पण आहेत. तर चला मग जाणून घेऊयात कोण कोणते फायदे आपणास मिळू शकतात.

1. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते. उसाचा रस प्यायल्याने यापासून बचाव होतो. उसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असल्याने शरीरासाठी ते फायदेशीर ठरतात. उसाचा रस सारखा प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते.

2. उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते. आणि तोंडातील हानिकारक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. परिणामी आपले हास्य आनंददायी होते.

3. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. उसाचा रस लिव्हरसाठी खूप लाभदायक असतो. उसाचा रस शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतो. Sugarcane Juice Benefits in Marathi

4. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

5. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.

6. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी सिद्ध झाला आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस सकाळी उपाशी पोटी नेहमी पिणे फायदेशीर आहे.

7. उसाचा रस हा नैसर्गिक पेय असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा. Sugarcane Juice Benefits in Marathi

8. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट प्रमाणात घेतला तर उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

9. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो ताजा असतानाच पिणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये बर्फाचा वापर सुद्धा मर्यादित स्वरूपात करावा. तसेच ज्या ठिकाणी आपण रस घेणार आहेत तेथील स्वच्छता हि महत्वाची आहे.