| |

उसाचा थंडगार रस देतो आरोग्यवर्धक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ताजा आणि थंडगार असा उसाचा रस पिण्याचा आनंद काही अनोखाच असतो, हे आपण सर्वानी अनुभवलेच असेल. मुळात उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने शरीरास कृत्रिम पेय प्यायल्याने होणारी हानी निश्चितच होत नाही. शिवाय उसाचा रस फक्त गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारांना आपल्यापासून खूप दूर ठेवतो. इतकेच नव्हे तर उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते. चला तर जाणून घेऊयात उसाचा रस पिण्याचे आरोग्यास होणारे फायदे कोणते ते. खालीलप्रमाणे:-

१) उसाचा रस नैसर्गिक पेय आहे. त्यामुळे शरीर डिहायड्रेट रसाचे सेवन करणे अतिशय उत्तम मानले जाते.

२) उसाचा रस पिण्यामुळे आपली त्वचा पिंपल्स, डाग आणि खड्डे यांपासून सुरक्षित राहते.

३) उसाच्या रसात ग्लूकोजची अधिक मात्रा असते. जे याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे शारीरिक ऊर्जा मिळवण्यासाठी उसाचा रस फायदेशीर असतो.

४) जुनाट खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरसुद्धा उसाचा रस परिणामकारक असतो.

५) उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी मानला जातो. त्यामुळे अनेकदा आयुर्वेदिक औषधी उपचारादरम्यान कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

६) उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून हळहळू मुक्ती मिळते. कारण उसातील तत्व बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. यामुळे दातांचे इनफेक्शनपासून रक्षण होते.

७) उसाचा रस नैसर्गिक विशेष फायदा म्हणजे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे पेय पिऊ शकते.

० महत्त्वाचे :-
– ऊस हा नाशवंत असल्यामुळे नेहमी ऊस खाण्याआधी किंवा उसाचा रस पिण्याआधी तो ताजा असणे आवश्यक आहे.
– उसाचा रस पिण्याचे गंभीर परिणाम नसले तरीही त्याचे अधिक सेवन शरीरातील उर्जेस चालना देतात. यामुळे त्याचे अधिक सेवन केल्यास उष्णतेचे त्रास जाणवू शकतात.
– साधारण १ ते ४ वयोवर्षाच्या बालकांनी उसाचा रस मर्यादेत प्यावा.
– मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उसाच्या रसाचे सेवन करावे.
– गर्भवती महिलांनी उसाचा रस पिणे टाळावे.