Summer Skin Care Tips
| |

Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| रोजच्या रूटीनमध्ये निवांत वेळ कुणाकडेच नाही. त्यामुळे ना शारीरिक आरोग्याकडे कुणाचे लक्ष आहे ना मानसिक आरोग्याकडे. इतकेच नव्हे तर आपल्या त्वचेच्या आरोग्याकडेदेखील लक्ष द्यायला आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. त्यात आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशात त्वचेची अत्यंत बारकाईने काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा उन्हामुळे डार्क सर्कल्स, पिंपल्स, आणि स्कीन टोनची समस्या मोठी होते.

अशा वेळी टोनिंगमूळे घराबाहेर पडताना देखील चार वेळा विचार करावा लागतो. मग हा गेलेला स्कीन ग्लो परत कसा आणायचा? तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. अगदी साध्या सोप्या रूटीन टिप्सच्या सहाय्याने या समस्येवर मात करता येईल. जाणून घ्या खालीलप्रमाणे (Summer Skin Care) :-

१) बॉडी नियमित हायड्रेट ठेवा
शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायल्याने त्याचा फायदा संपूर्ण शारीरिक क्रियांसोबत त्वचेलासुद्धा होतो. याचे कारण म्हणजे शरीरातील सर्व पेशी पाण्यापासून बनलेल्या असतात.

Drinking Water

जेव्हा या पेशींना पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा त्या कोरड्या होतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. यासाठी दररोज किमान ८ ग्लास पाणी प्या आणि ते एकाच वेळी पिण्याऐवजी दिवसभर प्या.

२) पुर्ण झोप घ्या
नियमित पुरेशी झोप घेतल्याने मांसपेशींना आराम मिळतो. यामुळे त्वचा कोरडी होणे आणि डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येण्याची समस्या दूर होते.

Sleep

झोप आवश्यक असण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप तुमच्या त्वचेवर पिंपल्स तयार करते. तसेच अपुरी झोप त्वचेच्या गुणवत्तेवर आणि पोतावर परिणाम करते. त्यामुळे रोज रात्री किमान ८ तास झोपण्याचा प्रयत्न करा.

३) त्वचा एक्सफोलिएट करा
आपल्या त्वचेची व्यवस्थित निगा राखण्यासाठी मृत त्वचेच्या पेशी योग्यरित्या काढून टाकणे म्हणजेच त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

यासाठी सनस्क्रीन, व्हिटामीन सी, फेस मास्क, मसाज तेल शोषून घेण्यास मदत होते. याशिवाय सुरकुत्या कमी होऊन त्वचेवर ग्लो येतो. 

४) त्वचा मॉईश्चराईज करा
त्वचेतील आर्द्रता टिकवायची असेल तर आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे विसरू नका.

moisturize

हिवाळ्यात मॉइश्चरायझरची आवश्यकता असते कारण त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. तसेच उन्हात मॉइश्चरायझरची गरज असते कारण या दिवसात त्वचेतील आद्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडते.

५) त्वचेवर सनस्क्रीन लावा
सूर्याची किरणे UVB आणि UVA सारखी घटक किरणे उत्सर्जित करत असतात. यामुळे त्वचेचा पोत खराब होतो. UVB किरणांची तीव्रता त्वचा टॅन वा बर्न करते.

त्यामुळे चांगल्या स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ज्यामुळे त्वचेचे दोन्ही किरणांपासून संरक्षण होईल. 

उन्हाळ्याच्या दिवसात न चुकता या टिप्सचे पालन केलात तर नक्कीच (Summer Skin Care Tips) उन्हामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळता येईल.