Sweat In Summer : उन्हाळ्यात येणाऱ्या घामाला करा राम राम; जाणून घ्या घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। खूप गरमी आणि अति उष्ण वातावरणात शरीरातून (Sweat In Summer) घामाच्या धारा निघू लागतात. चोवीस तास पंखे, कुलर आणि एसी चालू ठेवूनही नुसतं घामाघूम व्हायला होत. त्यात आता कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. मग काय बघायलाच नको. घराबाहेर पडताना किमान १० वेळा विचार करावा लागतो. त्यात सूर्याच्या किरणांचा मारा इतका भीषण असतो कि, त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यात शरीरातील पाणी घामाच्या माध्यमातून उत्सर्जित होऊ लागते. परिणामी बॉडी डिहायड्रेट होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी शारीरिक आवश्यकतेनुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे.
घाम काय सगळ्यांनाच येतो. त्यात काय वेगळं आहे. असे म्हणून जर तुम्ही घाम येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असाल तर असे करू नका. कारण अत्याधिक घाम येण्याचा परिणाम हा व्यक्तीच्या रोजच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. तसेच जास्त घामामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात.
बहुतेकदा उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे वा व्यायामामुळे तसेच जास्त गरम वा तिखट पदार्थ खाल्याने, मानसिक तणाव आणि भीती या कारणांमुळे घाम जास्त येतो. मात्र इतरवेळीही असाच जास्त प्रमाणात घाम येत असेल तर हि स्थिती हायपरहायड्रोसिस संबंधित असू शकते. त्यामुळे आपणास जास्त प्रमाणात घाम येत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावेत. (Sweat In Summer)
तर मित्रांनो आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या घामावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊ कि, घाम का येतो आणि या समस्येवर कोणते घरगुती उपाय करावे? खालीलप्रमाणे:-
० घाम का येतो..?
(Sweat In Summer)
आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथीद्वारे घाम तयार होतो. या ग्रंथी संपूर्ण शरीरावर असतात. त्यातही त्या प्रामुख्याने कपाळावर, काखेत, हातापायांच्या तळव्यांवर जास्त असतात. त्यामुळे या भागांवर घाम अधिक येतो. तसेच घामामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. शिवाय सोडिअम, पोटॅशियम अशी क्षारतत्वेही घामात असतात. घाम येणे एका दृष्टीने चांगले मानले जाते. कारण शरीरातून उत्सर्जित होणार घाम हा आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतो. ज्यामुळे इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत नाहीत.
० घाम येण्याच्या समस्येवरील घरगुती उपाय
१) नियमित अंघोळ करा – सगळ्यात महत्वाचे म्हणजे शारीरिक स्वच्छता हि कोणत्याही आजार आणि आरोग्यविषयक समस्यांचे समाधान करू शकते. त्यामुळे जास्त घाम येण्याच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर नियमित अंघोळ करणे अत्यंत आवश्यक आहे.
२) पुरेसे पाणी प्या – घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी साधारण ८ ते १० ग्लास पाणी दिवसभरात प्या. यामुळे एकतर घामामुळे होणार इचिंग थांबेल आणि घामाला येणाऱ्या दुर्गंधापासुन थोडक्या प्रमाणात आराम मिळेल. (Sweat In Summer)
३) बेकिंग सोडा – घामाच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर घाम येणाऱ्या ठिकाणी कापसाच्या बोळ्याने ते मिश्रण लावा. यानंतर साधारण ३० मिनिटांनी अर्थात अर्ध्या तासाने आंघोळ करा. यामुळे घाम येणे नियंत्रणात येईल.
४) लिंबू – हातापायाच्या तळव्यांना वा काखेत जास्त घाम येत असेल तर अर्धा लिंबू जास्त घाम येणाऱ्या भागावर चोळा. यानंतर ३० मिनिटांनी हात पाय धुवा किंवा अंघोळ करा. लिंबूमधील सायट्रिक ऍसिड बॅक्टेरिया नष्ट करून घाम कमी होण्यास मदत करतात. (Sweat In Summer)
५) बटाटा – खूप घाम येत असेल तर बटाट्याचा वापर करता येईल. काय कराल की, शरीराच्या ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो त्या भागावर बटाट्याचे काप चोळा. असे केल्याने घाम नियंत्रित होईल आणि दुर्गंधदेखील कमी होईल.
६) टोमॅटो खा – खूप घाम येणाऱ्या लोकांनी रोजच्या आहारात टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस प्यावा. यामुळे जास्त घाम येण्याची समस्या कमी होते. यासाठी कच्च्या टोमॅटोचे सेवन देखील फायदेशीर ठरते. (Sweat In Summer)
७) ग्रीन टी – खूप घाम येण्याच्या समस्येला वैतागला असाल तर, दैनंदिन जीवनशैलीत १ कप ग्रीन टी जरूर प्या. यामुळे घामावर नियंत्रण ठेवता येईल. तसेच यामुळे घामाच्या दुर्गंधीपासूनदेखील आराम मिळेल.
८) सुती कपडे वापरा – जास्त घाम येत असेल तर सुती आणि सैल कपडे वापरा. कारण कृत्रिम धाग्यामुळे त्वचेला आलेला घाम शोषला जात नाही. ज्यामुळे त्वचेला रॅश येतात, इन्फेक्शन होते, तसेच घामोळ्यादेखील उठतात. या त्रासापासून सुटका होण्यासाठी उन्हाळ्यात प्रामुख्याने सुती व सैल कपडे वापरावे. (Sweat In Summer)
‘हे’ पण वाचा :-
Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या
Summer Care Tips For Babies उन्हाच्या तीव्रतेपासून बाळाचे करा रक्षण; जाणून घ्या टिप्स