| |

शरीरातील उष्णेतवर गुलकंद गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गुलकंदाचे नुसते नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते नाही का? पण ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने बनवलेले गुलकंद केवळ चविष्ट नव्हे तर अत्यंत गुणकारी देखील असते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला गुलकंद जसा चवीने गॉड तास वासाने अत्यंत सुगंधित असतो. मुळात गुलकंद मुरंब्यासारखे दिसते. याचा वापर विविध अन्नपदार्थांमध्येदेखील केला जातो. गुलकंदाचे अनेको गुणधर्म आरोग्याच्या समस्येसाठी अत्यंत फायदेशीर असतात. शिवाय शरीरातील अत्याधिक गर्मीच्या त्रासांवर गुलकंद अतिशय उपयोगी ठरते. त्यामुळे गुलकंद शरीराच्या विविध समस्यांसाठी विविध फायदे देणारे असते. चला तर जाणून घेऊयात गुलकंदाचे गुणकारी फायदे.

१) उष्णतेच्या समस्या – गुलकंद आपल्या शरीरातील अवयवांना थंडावा देण्याचे काम करते. यामुळे जेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे विविध समस्यांना उभारी येते तेव्हा गुलकंदाचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते. शरीरातील उष्णेशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून गुलकंदाचे सेवन मुक्त होण्यास मदत करते.

२) मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा – गुलकंदाचे नियमित सेवन केले असता मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.याकरिता सकाळी आणि संध्याकाळी केवळ १ मध्यम चमचा गुलकंद खाणे फायद्याचे ठरते. यामुळे मेंदूला शुद्धी आणि ताजेपणा मिळतो. परिणामी मेंदू शांत राहतो आणि राग, ताण आणि तणाव अश्या समस्या उदभवत नाहीत.

३) पाचक प्रणालीत सुधार – बद्धकोष्ठता किंवा अपचन झाले असता गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते. दररोज गुलकंदाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि भूक वाढण्यासह पाचक प्रणाली कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांचे विघटन करण्यास मदत होते. गरोदरपणात विशेषतः गुलकंद फायदेशीर आणि सुरक्षित आहे.

४) डोळ्यांच्या समस्या – डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि डोळ्यांना थंडावा देण्यासाठी गुलकंदाचा वापर करणे एक चांगला उपाय आहे. डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे आणि कंजक्ट‍िवाइटिसचा त्रास होण्यापासून मुक्तता मिळते.

५) तोंडाच्या समस्या – गुलकंदाचे सेवन केल्याने तोंडातील त्वचेसंबंधित असणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळते. शिवाय ओठांचे सालपट जाणे, तोंडाच्या आतील त्वचा लाल होणे या समस्यांवर गुलकंदाचा थंडावा देणारा गुलकंद अत्यंत फायदेशीर ठरतो.

६) हृदयाच्या समस्या – गुलाबाच्या पानांपासून बनविलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियम आढळते. रक्तदाब आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅग्नेशियम सक्रिय कार्य करते. तसेच, हृदयाला सहजतेने कार्य करण्यास गुलकंद मदत करते. परिणामी आपले हृदय निरोगी ठेवण्यास गुलकंद उपयुक्त असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *