Take a teaspoon of honey after a meal to get rid of stomach problems
|

जेवणांतर एक चमचा मध घेऊन पोटाच्या समस्या करा दूर

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । अनेकांना जेवण जर जास्त प्रमाणात झाले तर मात्र पोटाच्या समस्या जाणवायला सुरुवात होतात. पोटाच्या समस्या सुरु झाल्या कि, कि मात्र आपल्याला अनेक प्रकारचे त्रास हे जाणवायला सुरुवात होतात. पोटाच्या समस्यांमधून आपल्याला गॅस होणे , पचन न होणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर कमीत कमी जेवणानंतर एक चमचा शुद्ध मध खाणे किंवा त्याचे चाटण करणे आरोग्याच्या दृष्ट्टीने महत्वाचे आहे.

आजकाल बाजारात मिळणारा मध हा खाण्याच्या दृष्टीने अजिबात चांगला नसतो , त्याच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुळाची भेसळ हि केलेली असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले नाही. मध हा आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. लहान मुलांना सुद्धा मध हा चाटण म्हणून ज्येष्ठमध दिले जाते. कारण ते बाळाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करण्याचे काम करते. नैसर्गिक रित्या मध तयार होणे यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे बाजारात गुळाचा पाक तयार करून विकला जातो.

मध हा अँटिऑक्सिडंट असलेला घटक आहे. त्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आपले पोट फुगणे गॅस निर्माण होणे या समस्या जास्त प्रमाणात जाणवणार नाहीत. त्यामुळे दिवसातून कमीत कमी एकदा मधाच्या चाटण हे करून घ्यावे. मध हा आपल्याला पोटाच्या समस्यापासून दूर राहण्यास मदत करते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *