care about a skin
|

रंगाची ऍलर्जी असेल तर अशी घ्या काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । होळीच्या दिवशी सगळीकडे रंग खेळले जातात. त्या दिवशी सगळ्यांचा रंग खेळायला आवडतात. पण जर तुम्हाला रंगाची ऍलर्जी असेल तर त्यावेळी आपल्या चेहऱ्याची आणि त्वचेची कशी काळजी घेतली गेली पाहिजे. वर्षांतून एकदा येणाऱ्या सणाचा प्रत्येक जण मनमुराद आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्वचेच्या समस्या या जाणवत असतील तर त्वचेसाठी कशी काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया ….

— होळी खेळायला जाण्यापूर्वी ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत, त्या लोकांनी आपल्या हाताला तसेच अंगाला तेल किंवा तूप याचा वापर करावा.तेलाने मालिश करूनच खेळायला जावे, म्हणजे त्वचेवर दुष्टपरिणाम दिसून येणार नाहीत.

— होळी खेळताना शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर हा केला जावा.रासायनिक पदार्थ जर वापरले तर कदाचित चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे चेहरा हा अजून खराब दिसायला सुरुवात होते.

— कलर काढण्यासाठी नेहमी कोरफड चा वापर केला जावा. कोरफड हि औषधीच्या रुपात कार्य करते. कोरफड जेल हे आपल्या चेहर्‍यावर लावता येऊ शकतं कोरफड लावल्यानंतर दहा मिनिटांनी आपला चेहरा हा साफ करा.

— चेहरा हा स्वच्छ करण्यासाठी आइस क्युब चा वापर केला जाऊ शकतो.

— एलर्जी पासून दूर राहण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग करता येऊ शकतो. कडुलिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेला रंगांपासून होणार्‍या अलेर्जीपासून बचाव करेल.

— चेहर्‍यावर जास्त प्रमाणात रंग लागला असल्यास कच्‍चं दूध, चंदन पावडर, बेसन आणि दही याचे मिश्रण तयार करुन चेहर्‍यावर लावावे. वाळल्यावर गार पाण्याने धुऊन घ्यावे.

— जर होळीचा रंग हा निघत नसेल तर त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर लोशन लावून ठेवावे. त्यामुळे जो कलर आहे, तो निघून जाण्यास मदत होऊ शकते.

— कलर निघून जाण्यासाठी जर कोणी कपड्यांचा साबण वापरत असेल तर ते चुकीचे आहे. कपड्याच्या साबणामुळे चेहरा हा रफ होतो.