| | |

हृदयाच्या आरोग्यासाठी अशी घ्या आहाराची काळजी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जीचा दिनक्रम हा उत्तम आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यात वातावरणातील अचानक होणारे बदल, वाढते प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर आधीच वाईट परिणाम होत असतो. आता चुकीची जीवनशैली आणि आहाराच्या अयोग्य पद्धतीचा अवलंब केला तर साहजिकच याचा त्रास आपल्याला होणार. यात आपल्या हृदयाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. यामुळे जगभरात प्रत्येक दोन व्यक्तींमागे एका व्यक्तीला हृदयाशी संबंधित कोणता ना कोणता आजार आहेच. याशिवाय मधुमेह, रक्तदाब या समस्यादेखील मोठ्या प्रमाणात आपले जाळे पसरत आहेत. यांपैकी एकही रोग संसर्गजन्य नाही. हे आजार होण्याचे कारणंच आपला आहार आणि जीवनशैली आहे. आपले हृदय आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. यामुळे हृदय सुरक्षित तर आपण ठणठणीत हे लक्षात ठेवा. चला तर जाणून घेऊयात कि हृदय रोगाचा धोका कुणाला संभवतो आणि त्यांनी आपल्या आहाराची काळजी कशी घ्यावी ते खालीलप्रमाणे:-

० हृदय रोगाचा धोका कुणाला?
– मित्रांनो हृदय रोग आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होण्याची शक्यता असतेच. याशिवाय काही आजार आधीपासून असतील तर त्यामुळेदेखील हृदयाला धोका संभवतो. यात
मधुमेह (डायबेटीस),
उच्च रक्तदाब/ हाय ब्लडप्रेशर,
उच्च कोलेस्ट्रॉल,
लठ्ठपणा
गुड कोलेस्टेरॉल 50 पेक्षा कमी असणे. या समस्यांचा समावेश आहे.

० हृद्याच्या आरोग्यासाठी असा असावा आहार

१) आहाराचे ४ भाग करा. सकाळ, दुपार, मध्य संध्या, रात्र संध्या.

२) तुमचा आहार हलका असेल याची काळजी घ्या.

३) सुपाच्य अर्थात सहज पचणारा आहार घ्या.

४) तुमच्या आहारात
– हिरव्या पालेभाज्या,
– हंगामी फळे,
– फळभाज्या,
– कोशिंबीर,
– बदाम,
– मनुका,
– मोड आलेली कडधान्ये,
– तंतूमय पदार्थ इत्यादी पदार्थांचा भरपूर समावेश करा.

५) उत्तम दर्जाचे असे स्निग्ध पदार्थ आहारात असतील याची काळजी घ्या.

 

० हृद्याच्या आरोग्यासाठी काय खाणे टाळालं?

१) ट्रांस फॅट्स वा कृत्रिम स्निग्ध पदार्थ. उदा. वनस्पती तूप यात ट्रांस फॅट्सचे प्रमाण अधिक असते.

२) हवाबंद पाकिटे, शीतपेये, मिठाई, बेकरी पदार्थ.

३) खारी बिस्किटे, चिवडा, स्नॅक, चिप्स यांसारख्या पदार्थांच्या पाकीटावरील मिठाचे प्रमाण पहा आणि ४ ग्रॅम पेक्षा अधिक असल्यास खाणे टाळा.

४) तेलकट, आंबट, पचायला जड आहार नकोच.

५) धुम्रपान, मद्यपान, तंबाखू यांसारख्या व्यसनांचा त्याग करा.