| | |

फ्रुट ज्यूस पिताना काय काळजी घ्याल?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। फळांमध्ये अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात.यामुळे एखादी व्यक्ती अन्नाऐवजी केवळ फळ खात असेल, तर तो आपले संपूर्ण आयुष्य निरोगी आणि सहजोगत्या जगू शकेल. फळांमुळे व्यक्तीला जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात. शिवाय फळे सहज पचतात. कारण यात ८० ते ९० % पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या आहारात असल्यास आरोग्याला अतिशय फायदा होतो.

अनेक लोक फळ असेच खाण्यापेक्षा त्याचा रस वा स्मूदी पिणे पसंत करतात. यात कलिंगड, अननस, पपई, पेरु, केळी, चिकू, स्ट्रॉबेरी अशा अनेक फळांचा समावेश आहे. फळांच्या रसाचा आहारात समावेश केल्यामुळे शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन C, A, B असे बरेच घटक मिळतात. शिवाय पोटाचे आरोग्य, त्वचेचे आरोग्य आणि वेगवेगळ्या फायद्यांसाठी फळांच्या रसाचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. पण फळांचे रस पिताना काही गोष्टींची काळजी घेणेदेखील तितकेच गरजेचे असते. आता नेमकी काळजी म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी हा लाख पूर्ण वाचा.

० फ्रुट ज्यूस पिताना घ्यावयाची काळजी

१) खराब फळांचा वापर टाळा.
– काही जणांना वाटते की फळ नरम पडले की त्याचा उपयोग रस काढण्यासाठी केला जातो. जसे कि सफरचंद, संत्री, कलिंगड अशी फळ नरम पडली की, त्याचा रस काढला जातो. पण अशी खराब झालेली फळ आणि त्यांचे रस हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे फळाचा रस पिणार असाल तर फळ ताजी आणि चांगली असतानाच वापरा. यामुळे आरोग्याला हानी पोहोचणार नाही.

२) जास्त वेळ ठेवू नका.
– फळांचा रस काढण्यासाठी मशीन वा मिक्सरचा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकच फळांना कापण्यासाठी वा बारीक करण्यासाठी ब्लेडचा वापर होतो. त्यामुळे फळांच्या रसामध्ये असलेल्या घटकावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा रसामध्ये पोषक घटक नव्हे तर विषारी घटक वाढतात. त्यामुळे असे ज्यूस जास्त काळासाठी ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असते. तसेच ज्यूस तयार करून बराच वेळ ठेवला असेल आणि नंतर प्यायला तरीही पोटाला याचा त्रास होतो. यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला डाएटमध्ये ज्युस प्यायचा असेल तेव्हा तुम्ही ज्युस तयार करा आणि लगेचच प्या.

३) वेगवेगळे मसाले घालू नका.
– फळांचा रस खूप जणांना आवडत नाही. केवळ हेल्दी डाएटचा भाग म्हणून खूप जण विविध फळांचा ज्यूस पितात. खूप जणांना हे रस चटपटीत आवडतात. त्यामुळे अशा फळांच्या रसामध्ये खूप जण मीठ वा चाट मसाला घालतात. त्यामुळे फळांचा रस चविष्ट लागतो पण पोषक उरत नाही. त्यामुळे कोणत्याही फळाच्या रसात मीठ किंवा कोणताही मसाला घालू नका. यामुळे त्यातील अनेक घटक विषारी घटकांमध्ये रुपांतरीत करतात.

४) फ्रिजमधला किंवा बर्फ घातलेला ज्यूस पिऊ नका.
– अनेकांना फळांचा रस पिताना तो थंडगार हवा असे वाटते. त्यामुळे एकतर हा ज्यूस बनवून फ्रिजमध्ये ठेवला जातो किंवा मग यामध्ये बर्फाचे तुकडे घालून प्यायले जाते. पण कोणत्याही फळांचा रस फ्रिजमध्ये बराच काळ ठेवल्यास फळातून शरीराला मिळणाऱ्या पोषक घटकांमध्ये घट होते. शिवाय बर्फ घालून ज्यूस प्यायल्यास घश्याला त्रास संभवतो.