| |

पब्लिक टॉयलेट वापरताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता दूरचा प्रवास करायचा म्हणजे साहजिकच आपली नजर टॉयलेटचा शोध काही काळानंतर का होईना घेणारच ना. याचसाठी रेल्वे स्थानक असो किंवा बसस्थानक अश्या सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे असतात. आजकाल तर अगदी मॉल आणि हॉटेलमध्येसुद्धा अतिशय स्वच्छ असे पब्लिक टॉयलेट असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी सार्वजनिक टॉयलेट वापरले जातात. मात्र महत्वाचे असे कि सगळीकडेच सार्वजनिक टॉयलेट स्वच्छ नसतात. त्यामुळे असे पब्लिक टॉयलेट्स वापरण्याआधी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

पब्लिक टॉयलेट वापरल्यानंतर आजारी पडायचं नसेल तर अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोणतेही संसर्गजन्य विषाणू टॉयलेटच्या माध्यमातून आपले स्वास्थ्य खराब करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. असे अनेकदा होते कि मॉल वा हॉटेल, मोठमोठे रेस्टॉरंटमध्ये असणारे टॉयलेट वापरताना फारशी भीती वाटत नाही. कारण या ठिकाणी बरीच स्वच्छता राखली जाते. ज्यामुळे संसर्गाची शक्यता कमी असते. मात्र रेल्वेस्थानक, बसस्थानक वा अन्य रस्त्यालगत असलेले स्वच्छतागृह स्वच्छ आणि सुरक्षित असतील याची खात्री देता येत नाही. कारण दिवसातून मिनिटामिनिटाला हे टॉयलेट वापरले जातात. मात्र अडचणीच्या वेळी ते टॉयलेट वापरण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कटाक्षाने पाळणे अपेक्षित आहे.

० सार्वजनिक टॉयलेट वापरण्यापूर्वी या गोष्टींची दक्षता घ्या –
१) टॉयलेटमध्ये बिना मास्क जाऊ नका.
२) टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवा.
३) जास्त वेळ सार्वजनिक टॉयलेटमध्ये थांबू नका.
४) सार्वजनिक टॉयलेटमधील कमीत कमी गोष्टींना स्पर्श कराल याची काळजी घ्या.
५) सार्वजनिक टॉयलेटमधील इतर लोकांपासून अंतर पाळा.
६) जास्त गर्दी असलेले आणि अति अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करू नका.

अत्यंत महत्वाच्या बाबी

० सार्वजनिक टॉयलेटचा फ्लश वापरताना काय काळजी घ्यावी?
– सार्वजनिक टॉयलेटचा वापर झाल्यावर फ्लशचा वापर करताना हातात ग्लोव्ज अथवा टॉयलेट नॅपकीन ठेवा. वापरानंतर या गोष्टींची योग्य पद्धतीने व्हिलेवाट लावा. शिवाय हात धुवेपर्यंत फ्लश केलेल्या हाताने शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावू नका. फ्लश करण्यापूर्वी कमोडचे झाकण बंद करा. ज्यामुळे संसर्गाचा धोका टाळता येतो.

० आपल्या वस्तू कश्या सांभाळालं?
– पब्लिक टॉयलेट वापरण्यापुर्वी आपले साहित्य सोबतच्या व्यक्तीला टॉयलेटबाहेर सांभाळण्यास सांगा. कारण, या वस्तू टॉयलेटमध्ये घेऊन गेलात तर त्यांच्या माध्यमातून जीवजंतू घरी आणि जाल तिथे पसरू शकतात. जर तुमच्यासोबत कुणीच नसेल, तर या वस्तू जमिन अथवा वॉश बेसिनजवळ ठेवण्यापेक्षा दरवाज्यामागे असलेल्या हूकावर अडकवा आणि वापर झाल्यावर आपल्या वस्तू सॅनिटायझर सरफेस स्प्रेने निर्जंतूक करून घ्या.

० पब्लिक टॉयलेट वापरल्यानंतर हात धुताना काय काळजी घ्याल?
– कोणतेही पब्लिक टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुणे विसरू नका. किमान २० सेकंद आपले हात स्वच्छ पाण्याने धुवा. आजकाल सार्वजनिक टॉयलेटमध्ये पाणी आणि साबणाची सोय असते. परंतु ती नसेल तर सॅनिटायझरचा वापर करा. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना तुमच्या बॅगेत एक छोटी सॅनिटायझरची बाटली असायलाच हवी.