feet

घरगुती पद्धतीने अशी घ्या पायांची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  नेहमी महिला या आपल्या घरात जर एखादा कार्यक्रम असेल तर त्याच वेळी मात्र खूप छान  तयार होतात. त्याच वेळी आपल्या चेहऱ्याकडे आणि आपल्या स्कीन कडे जास्त लक्ष देतात. अनेक वेळा हात आणि चेहरा याच गोष्टींकडे लक्ष दिले जाते . पायांकडे लक्ष दिले जात नाही . पण जर तुमचे पाय पण तुम्हाला सुदंर हवे असतील तर त्यावेळी घरगुती पद्धतीचा वापर करून आपले पाय हे मुलायम आणि सुदंर बनवू शकता. कसे ते जाणून घेऊया ….

बनाना मास्क—-

आपल्या आहारात केळीचे खूप महत्व आहे . केळी हि स्किन साठी सुद्धा वापरली जाते . त्वचा मुलायम होण्यासाठी केळ देखील वापरले जाते. घरी एखादे पिकलेलं केळं असेल तर ते स्मॅश करुन घ्या आणि तुमच्या पायांना केळ्याची पेस्ट लावा. हा मास्क पूर्ण वाळल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून घ्या. कोरडे करुन त्यावर मॉश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा तरी केळ्याचा मास्क लावा. काही दिवसांतच तुमच्या पायांमध्ये फरक पडलेला लक्षात येईल .

कॉफी स्क्रब —

तुमच्या पायांवरील टॅन काढून टाकायचा असेल तर त्यावेळी तुमच्या चेहऱ्यासाठी आणि पायांसाठी कॉफीचा वापर हा केला जातो. कॉफीच्या स्क्रब मुले जी हातावरील आणि पायांवरील मृत त्वचा आहे , ती त्वचा निघून जाण्यास मदत करते . कॉफी वापरताना नेहमी फिल्टर करूनच वापरली गेली पाहिजे . त्याचा काहीसा जाड भाग ठेवून त्याच्यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर हा करून त्याचे स्क्रब तयार करा आणि ते स्क्रब हे आपल्या पायाला लावा . म्हणजे त तुमची स्किन हि उजळेल .