nose piercing
| | |

नाक टोचल्यावर अशी घ्या काळजी, अन्यथा जखम झाल्यास व्हाल हैराण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतामध्ये बहुतांश मुली आपल्या नाकामध्ये नथ आणि कानामध्ये कुंडल (बाली) घालतात. ही एक जुनी प्रथा असली तरी आजकाल फॅशन म्हणून याकडे पाहिले जाते. कारण, नथ आणि कुंडल हे दोन्ही सोळा शृंगारामध्ये समाविष्ट केलेले आहेत. यामुळे प्रामुख्याने मुलींच्या सौंदर्यात भर पडते. यामुळे सामान्यतः या गोष्टीकडे सौंदर्याच्या दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे हि प्रथा जबरदस्ती नाही तर आवडीने मान्य करण्यात आली आहे. याआधी नाक टोचणे वा कान टोचणे या प्रथेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जायचे. अनेक लोकांच्या दृष्टिकोनातून या प्रथेचा अर्थ वेसण घालणे असा आहे. मात्र जशी पुढची पिढी आधुनिक झाली तसा हा विचार मागे ढकलला गेला. यानंतर आजच्या पिढीच्या म्हणण्यानुसार, नाक किंवा कान टोचणे हि परंपरा कुणावर हक्क. ताबा मिळवण्यासाठीसाठी नव्हे तर स्वातंत्र्य दर्शविण्यासाठी आहे. त्यामुळे आजकाल मुली, स्त्रिया आपल्या आवडीप्रमाणे शरीरावर छिद्र करून घेत आवडीच्या चमकी परिधान करतात.

पण मैत्रिणींनो, अनेकदा असे होते कान वा नाक टोचल्यानंतर त्या जागी जखम होते. हि जखम इतकी वाढते कि त्याचा त्रास होऊ लागतो. अनेकदा यामध्ये पाणी साठून पु (पांढऱ्या रंगाचे द्रव्य) तयार होतो. ज्यामुळे त्या भागात असह्य वेदना होऊ लागतात आणि पुढे पुन्हा कधीही नाक टोचून घेण्याची हिम्मत होत नाही. प्रत्येक वेळी नाक टोचायच म्हटलं तर त्याच जुन्या जखमा आठवतात. म्हणूनच अश्यावेळी छिद्र केल्या नंतर काही तासातच घरगुती उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. या गोष्टी माहित नसल्यामुळे या जखमांचा त्रास सहन करावा लागतो. चला तर जाणून घेऊया नाक वा कान टोचल्यास जखम होऊ नये म्हणून कशी आणि काय काळजी घ्यायची ते खालीलप्रमाणे:-

खोबरेल तेल – पुर्वी नाक टोचले तर ते टोचतानाच सोन्याची किंवा चांदीची एकदम पातळ मुलायम तार गोल नथनीसारखी करून सोनार त्या छिद्रात घालत असे. कारण सोन्याच्या तारेमुळे शक्यतो नाकाचा छिद्र पिकत नाही. त्यामुळे कोणतीही जखम होत नाही. फक्त थोडी सुज आणि ती जागा लाल होऊन नाक दुखायचे.

मग ती सुज कमी होण्यासाठी खोबरेल तेल लावले जायचे. हाच उपाय तुम्हीही करू शकता. कारण खोबरेल तेलामुळे छिद्र केलेल्या भागात शुष्कपणा येत नाही आणि त्यामुळे सूज उतरते. शिवाय जखमदेखील होत नाही.

शुद्ध कुंकू – पूर्वी लहान मुलांचे नाक किंवा कान टोचल्यानंतर शुद्ध कुंकू आणि तेलाचे मिश्रण त्या भागेवर लावले जायचे. यामुळे जखम होत नसे. पण हल्ली चांगल्या दर्जाचे कुंकू मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हा उपाय करताना आधी कुंकवाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासून पहा.

लवेंडर ऑईल – छिद्र केलेल्या भागावर लवेंडर ऑईलचा वापर केल्यास त्या भागावरील लालसरपणा कमी करता येऊ शकतो. शिवाय या तेलामुळे प्रभावित भागावरील सुजदेखील कमी होते आणि जखम होत नाही.

व्हिटामिन बी सप्लिमेंट – याशिवाय छिद्र केलेल्या भागावर ‘व्हिटामिन बी’च्या सप्लिमेंटचा वापर करता येईल. त्यामुळे नाकाचे संक्रमण आणि छिद्रानंतर येणारी सूजदेखील कमी होण्यास मदत मिळते.

हे लक्षात ठेवा!

नाक टोचल्यानंतर त्या भागावर अँटिसेप्टिक नियोस्पोरिन लाऊ नका. यामुळे जखम होण्याची शक्यता असते.

तसेच नाक टोचल्यावर इन्फेक्शन झाले तर फक्त मिठाच्या पाण्याने नाक धुवू नका. मीठासोबत हळदीचा वापर करा. जखम वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नाक टोळ्यांवर कधीही हायड्रोजन पॅराक्साईडचा उपयोग करू नका. अन्यथा नाकाला जळजळ आणि खाज येऊ शकते.

नाक टोचल्यावर नाकाला खराब हात अजिबात लावू नका. अन्यथा संसर्गाचा धोका वाढतो.

नाकात किंवा कानात दुस-याची वापरलेली रिंग कधीच परिधान करू नका.

टोचलेल्या नाकात वा कानात जबरदस्तीने रिंग घालू नका. अगदी हळूहळू प्रेमाने रिंग घाला. अन्यथा जखमा होण्याची शक्यता असते.

नाकात जी रिंग वा चमकी घालणार आहात त्याचा दर्जा चांगला असेल याची काळजी घ्या.