| |

लॉकडाऊन व्हर्जन 2.0 मध्ये अधिक गंभीरपणे घ्या ‘ही’ खबरदारी! अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो आरोग्य ऑनलाईन । ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट समोरून चालत येऊ लागली आहे. कोरोंनाच्या पहिल्या लॉकडाऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले, नवीन लस, औषध आले.  पण कोरोनाचा राक्षस अजूनही ‘आ’ वासून लोकांचे बळी घेऊ लागला आहे. त्यात नवीन आलेला स्ट्रेन तर अजून जास्तच धोकादायक आहे. व्हेंटिलेटर साठी लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही पुरवठा अपुरा होऊ लागला आहे. त्यासाठी सरकार परदेशातून लशीची आयात करून आपल्या नागरिकांना मोफत लस देत आहे. त्याचबरोबर दूसरा पर्याय म्हणून सरकार नवीन लॉकडाऊन आजपासून सुरू करणार आहे. सरकारने सुरु केलेल्या या काळजीला आपल्या खबरदारीची जोड देखील हवी तर आणि तरच आपण करोना सारख्या महाभयंकर राक्षसाच्या जबड्यातून सहज बाहेर येऊ शकू. तुम्हालाही सरकारला मदत म्हणून आणि कोरोनाचा सर्वनाश करण्यात खारीचा वाटा घ्यायचा असेल तर जाणून घ्या काय खबरदारी घेऊन तुम्ही कोरोनाला हरवू शकता!

असे वाटत होते कि लॉकडाऊनचे कडक पालन केल्यावर करोनाचे संकट कमी होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला आयुष्य पूर्वीसारखे हसत खेळत जगता येईल, पण काही केल्या हे संकट कमी होत नाहीये. उलट वाढत चाललं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारला सुद्धा नवीन लॉकडाऊन करावे लागत आहे. पहिलं, दुसरं, तिसरं लॉकडाऊन आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत चौथं लॉकडाऊन! त्यानंतर 17 जुलै 2020 नंतर चे लॉकडाऊन ठेवूनही हे संकट कमी होत नाही. आणि आज 14 एप्रिल 2021 लॉकडाऊनचे व्हर्जन 2.0 सुरू होत आहे.  परंतु याचा जर नीट विचार केला तर दिसून येईल की सरकार आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतंय, पण आपण नागरिक म्हणून सरकारला नीट साथ देत नाही आहोत.

जगात आज कित्येक देशांनी कडक लॉकडाऊन पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या आपल्याकडेही लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून मंडळी आपल्या देशासाठी आता आपली जबाबदारी आहे शक्य तितके नियम आणि सुरक्षा बाळगून हे लॉकडाऊन यशस्वी करून दाखवण्याची. आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन केले तर आपण आवर्जून कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो.

पहिली खबरदारी

लॉकडाऊन 2020 मध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये सरकारने काही प्रमाणात सुट दिली आहे. हि सूट हळूहळू आपले आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी अतिशय गरजेची होती. सूट दिली म्हणजे आपल्याला कोरोनाचा धोका नाही अश्या भ्रमात राहू नका, स्वच्छतचे नीट पालन करा. बाहेर जाताना मास्क आवर्जून वापरा. सॅनिटायझर नेहमी सोबत बाळगा. आपले कपडे गरम पाण्यातच धुवून घ्या. अशा गोष्टींमुळे तुम्ही कोरोनाच्या जंतूला तुमच्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकता.

दुसरी खबरदारी

आपल्याला सरकार पहिल्या दिवसापासून सांगतंय की सध्या कोरोना वर सर्वात प्रभावशाली उपचार आहे तो म्हणजे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे. परंतु जेव्हा जेव्हा सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट दिली तेव्हा तेव्हा लोकांनी गर्दी करून सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवला. आपल्या दैनंदिन आहारासाठी वस्तू आणण्याकरता लोकांची झुंबड उडू लागली. आजही बऱ्याच ठिकाणी हे दृश्य दिसते. आपल्याला सोशल डिस्टेंसिंगचे महत्त्व ओळखले पाहिजे. जरी प्रत्येकाने वैयक्तिक विचार केला कि मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही तरी देखील सोशल डिस्टेंसिंग आपण कसोशीने पाळू शकतो.

तिसरी खबरदारी

आपले तोंड, नाक आणि डोळे यांना हात वारंवार लावण्याची सवय आता सोडून द्या. अनेक लोकांमध्ये कोरोनाची छुपी लक्षणे सुद्धा असू शकतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीशी संपर्क आल्यास सरळ नाक, तोंड आणि डोळे यांना हात लावू नका. पहिले ते हात स्वच्छ करून घ्या. त्यासाठी हँडवॉश आणि अँटीबॅक्टरीअल साबणाचा वारंवार वापर करा.

चौथी खबरदारी

आताच्या लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी जीवनावश्यक गोष्टी तसेच महत्वाची ऑफिसेस सुरु ठेवली जाण्याची शक्यता आहे. जर तुमचं ऑफिस सुद्धा सुरु होत असेल तर तुम्हाला विशेष खबरदारी बाळगावी लागेल. ऑफिसला जाण्याआधी आपल्या बॅगेमध्ये नेहमी सॅनिटायझर ठेवा. जमल्यास ऑफिस मध्ये Gloves घालूनच वावरा आणि कोणत्याही गोष्टीला Gloves घालूनच स्पर्श करा. नेहमी मास्क परिधान करूनच फिरा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांपासून दूर राहा.

पाचवी खबरदारी

तुमच्या संपर्कात येणाऱ्या ज्या व्यक्तींमध्ये घशात खवखव, कोरडा खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे दिसत असतील त्यांच्यापासून शक्य इतके दूर राहा. एवढचं नाही जर तुम्हालाही अशी लक्षणे दिसली तर धोका न पत्करता तत्काळ हॉस्पिटल गाठून डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज पडल्यास आवर्जून टेस्ट करून घ्या. डॉक्टरांनी घरीच राहायला सांगितल्यास त्याचे आवर्जून पालन करा. एक लक्षात ठेवा या संकटाला आपणच दूर करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला सगळे नियम आणि ही खबरदारी योग्यरित्या पाळावी लागेल.

लक्षात ठेवा ‘जान है, तो जहान है।‘, आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचे नाही. कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या नातलगांचा विचार करा की ते तुमच्यावर अवलंबून आहेत.