| | |

आठवड्यातून फक्त एकदा स्टीम, त्वचा करी आतून क्लीन; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जुनाट सर्दी किंवा कफ खोकला यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी स्टीम अर्थात वाफ घेतली जाते. यामुळे अश्या समस्यांपासून आराम मिळतोच शिवाय घसा खवखवणे देखील बरे होते. परंतु तुम्हाला माहित आहे का? स्टीम घेणे फक्त इतकेच लाभ देत नाही तर सौंदर्यवर्धक लाभ देखील देतं. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर मैत्रिणींनो, आपला चेहरा सुंदर आणि तेजस्वी दिसावा म्हणून आपण प्रत्येक आठवड्यात किमान २ ते ३ वेळा पार्लरच्या फेऱ्या मारतो. पण तुम्हाला सांगू का? पार्लरमध्ये खर्चिक सोल्युशन घेण्यापेक्षा घरच्याघरी स्वस्त उपाय आजमवणे काय वाईट आहे. अगदी प्राचीन काळात स्त्रिया त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्टीम घ्यायच्या. यामागे कारण असे कि, स्टीम घेतल्याने त्वचा आतून स्वच्छ होते आणि मुरुम, सुरकुत्या किंवा ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. चला तर जाणून घेऊयात फायदे :-

१) चेहऱ्यावरील छिद्रात जमा झालेली घाण बाहेर काढते.
– वाढत्या प्रदूषणाचा थेट आपल्या शारीरिक, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यामुळे चेहऱ्यावर धूळ, माती आणि घाण त्वचेतील छिद्रांमध्ये जमा होते. यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या, पिंपल्स, खड्डे आणि मुरूम येतात. या समस्या होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा स्टीम घेणे आवश्यक आहे. कारण स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील मृत पेशी दूर होतात आणि त्वचेवरील छिद्र आतून व्यवस्थित स्वच्छ होतात.

२) त्वचेतील विषारी पदार्थ उत्सर्जित होतात.
– धूळ, माती, प्रदूषण यामुळे आपल्या त्वचेत न जाणे कित्येक विषाणू आणि त्वचेला बाधा पोहचवणारे घटक जाऊन बसतात. हे घटक हळहळू त्वचा खराब करू लागतात. तुम्हाला माहित असेल कि, घाम येणे आपल्या शरीरातील हेच विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. अगदी तसेच स्टीम आपल्या त्वचेमध्ये असलेले घातक विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते. म्हणूनच स्टीम घेतल्यानंतर चेहरा स्वच्छ करा. स्टीम त्वचेला या घटकांपासून पूर्णपणे मुक्त करते.

३) ब्लॅकहेड्सला टाटा बाय बाय – आपली त्वचा तेलकट असेल तर ब्लॅकहेड्सची समस्या स्वाभाविक आहे. अश्या व्यक्तींनी स्टीम घेणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यासाठी स्टीम घेण्यापूर्वी चेहरा कोणत्याही सौम्य फेसवॉशने व्यवस्थित धुवा आणि त्यानंतर किमान ५-१० मिनिटे स्टीम घ्या. यानंतर चेहरा व्यवस्थित स्क्रब करा. यामुळे त्वचेवर जमा झालेले ब्लॅकहेड्स दूर होतील. आठवड्यातून दोनदा स्टीम घेऊन हि प्रक्रिया करून पहा.

४) चेहरा करा मॉइस्चराइज – ज्या व्यक्तींची त्वचा कोरडी असेल त्यांनी स्टीम घेणे आवश्यक आहे. कारण स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर (हायड्रेटेड स्किन) ओलावा कायम राहतो. यासह, सुरकुत्यामुळे त्वचा सैल झाली असेल तर स्टीम घेण्याने ती घट्ट होते आणि चेहरा तेजस्वी दिसू लागतो.