| |

टेस्टी मेयॉनीज केसांसाठी हेल्थी; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले केस सुंदर आणि निरोगी असावे असे कुणाला वाटत नाही? तुम्हाला वाटत नाही का? वाटते ना? मग यासाठी केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल वाढत चाललेलं प्रदूषण आपल्या शारीरिक आरोग्यासह सौंदर्यावरदेखील तितकाच प्रभाव पाडत असतात. मुख्य म्हणजे प्रत्येकाचे केस काही एकसारखे नसतात. प्रत्येकाच्या केसांची गरज वेगवेगळी असते. कारण बदलते वातावरण प्रत्येकाच्या त्वचेसोबत केसांवर विविध पद्धतीने परिणाम करत असते. सर्वसाधारणपणे मोठे केस असल्यामुळे स्त्रियांना या समस्या जास्त त्रास देतात. पण आजकाल पुरुषांमध्येही केसांच्या समस्यांचे प्रमाण अधिक आहे.

– केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, अकाली केस पिकणे, स्काल्पला खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या समोर येऊन उभ्या राहतात आणि मग आपण न जाणे कित्येक उपायांचा शोध घेते, अवलंब करतो. अनेकांना त्या उपायांनी फरक देखील पडतो पण अनेकजण या तक्रारींनी आणखीच त्रस्त होतात. अश्या लोकांसाठी एकदम सोप्पं आणि घरगुती उपाय आज आम्ही सांगणार आहोत. तुम्हाला मेयॉनीज माहित आहे का? काय प्रश्न आहे.. आजकाल मेयॉनीज माहित नाही असे फार क्वचितच लोक आहेत आणि तुम्ही त्यापैकी असाल तर आज मेयॉनीजबद्दल जाणून घ्याच. कारण सँडविचमध्ये मेयॉनीजचा सर्रास वापर केला जातो आणि अनेक जण हे सॅंडविच अगदी चवीने खातात. जसा खाण्यासाठी मेयॉनीजचा वापर केला जातो तसा केसांसाठीसुद्धा याचा फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय…? तर चला जाणून घेऊया केसांच्या समस्येपासून वाचण्यासाठी मेयॉनीजचा वापर कसा होतो …

१) केसांना फाटे फुटणे हि समस्या जर तुम्हाला त्रास देत असेल तर मेयॉनीज यापासून तुमची सुटका करेल. मुळात केसांना फाटे फुटणे म्हणजे केस दोन भागांमध्ये विभागले जाणे. ज्यामुळे केसगळतीची समस्या वाढते. दुभंगलेल्या केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केसगळतीसह टक्कल सुद्धा पडू शकते. यावर मेयॉनीज मदत करते. कारण मेयॉनीजमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक घटक असतात. त्यामुळे केसांना फाटे फुटले तर मेयॉनीजचा वापर फायदेशीर ठरतो. केसांना मजबूती मिळण्यासाठी तसंच केसांना गळण्यापासून रोखण्यासाठी केसांना मेयॉनीज लावावे अगदी एखाद्या कंडिशनर प्रमाणे स्काल्पव्यतिरिक्त केसांवर मेयॉनीज लावून १० मिनिटांनी केस धुवून स्वच्छ करावे.

२) मेयॉनीज आणि एलोवेरा जेल एकत्र करून केसांना लावणे देखील फायद्याचे ठरते. हा हेअरमास्क केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. यासाठी १ चमचा एलोवेरा जेल आणि ३ चमचे मेयॉनीज एकत्र व्यवस्थित मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा. पुढे साधारण तासाभराची हे असेच राहूद्या. यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास चांगला फरक दिसून येईल. केसांना नैसर्गिक चमक आणि कोंडा नाहीसा होईल.

३) मेयॉनीजसोबत बदामाचं तेल मिसळून केसांना लावल्याने आपले केस अगदी दाट आणि मुलायम राहतात. यासाठी अर्धी वाटी मायोनीज आणि ४ चमचे बदामाचं तेल घेउन त्यात ३ अंडी व्यवस्थित मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा आणि एक तासाने केस सौम्य शॅम्पूने धुऊन टाका. असे केल्याने केसांमध्ये लगेच फरक दिसून येईल. यामुळे केसांना फाटे फुटणे, केसांत कोंडा होणे या समस्यांपासून आराम मिळेल.