Child Concentration
| | |

मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी सजग आसने शिकवा; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येकाला आपली मूलं अभ्यास, खेळ, स्पर्धा अशा प्रत्येक गोष्टीत इतर मुलांपेक्षा अग्रेसर असावी असे वाटत असते. पण मुलं आपल्या मनाचं तेव्हढं ऐकतात बाकीच्यांकडे दुर्लक्ष करतात. अनेक मुलं प्रत्येक बाबतीत हुशार असतात पण अचानक सगळ्यातून लक्ष काढून घेतात. अशावेळी मुलांची मानसिक आणि शारीरिक स्थिती अस्थिर झाली असण्याची शक्यता असते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मुलं अस्थिर होतात आणि आयुष्याच्या शर्यतीत देखील मागे पडतात.

अशावेळी मुलांमधील एकाग्रतेची कमतरता भरून काढणे आवश्यक असते. यासाठी मुलांचे मन आणि मेंदू दोन्ही तणावमुक्त असणे गरजेचे आहे. यासाठी मुलांचा आहार पौष्टिक आणि पोषणदायी असण्यावर भर द्या. शिवाय मुलांना सजग योगासने शिकवा आणि ती नियमित करायला लावा. आज आपण याच आसनांबाबत जाणून घेणार आहोत.

० मुलांमध्ये एकाग्रता वाढविणारी सजग आसने

१) ओंकार उच्चारण –

ओंकार हा एक पूर्ण योग आहे. यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. यामुळे आपल्या मुलांना ओंकाराचे उच्चारण शिकवणे आवश्यक आहे. यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

अशा प्रकारे हे आसन मुलांमध्ये सकारात्मक कंपन आणेल आणि मन शांत करून मुलांमध्ये एकाग्रता वाढवेल.

२) एक बिंदू –

घरात कोणत्याही भिंतीवर एक बिंदू तयार करून मुलांना त्याकडे जराही हालचाल न करता पाहायला सांगा. हे एक सोप्पे आणि सजग ध्यान आहे ज्यामुळे मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी मदत होते. यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

अशाप्रकारे हे आसन मुलांचे लक्ष केंद्रित करून त्यांना आपले ध्येय गाठण्यास प्रोत्साहित करेल.

३) लक्षपूर्वक आणि संयमी श्वासोच्छवास –

संयमी श्वासोच्छवासामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होते. वास्तविक, हा मुलांसाठी एक सोपा व्यायाम आहे. ज्याच्या सहाय्याने मुलांचे मन एकाग्र होऊ शकते. यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

अशाप्रकारे हे आसन मन आणि मेंदू शांत करेल. यामुळे तणाव आणि नैराश्यापासून मूलं लांब राहतील.

४) मन लावून चाला –

मुलांमधील हार्मोनल असंतुलित असल्यासदेखील मुलं चिडचिडी आणि मुडी होतात. ज्यामुळे त्यांचे चित्त थाऱ्यावर राहत नाही. यासाठी मुलांना मन लावून चालायला शिकवा. हा एक मजेशीर प्रयोग आहे. जो मुलांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सहाय्यक आहे. यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

अशाप्रकारे हे आसन मुलांना कार्यक्षम आणि तणावमुक्त होण्यास सहाय्य करेल.

५) वर्तुळाकार चाला –

वर्तुळाकार चालण्याने मुलांना आपण खेळ खेळात आहोत असे वाटते आणि त्यामुळे हि क्रिया मूळ अगदी आवडीने करतात. यात मुलांनी फार चालण्याची गरज नाही मात्र मन केंद्रित करून आपण चालताना वर्तुळावर चालत आहोत का याची खात्री करणे गरजेचे आहे. यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

अशाप्रकारे हे आसन मुलांना आत्म- नियंत्रण शिकवेल. यामुळे मुलं एकाग्रतेने कार्य पार करतील.

वरील प्रत्येक सजग ध्यान केल्याने मुलाचे मन आणि मेंदू शांत तसेच तणावमुक्त राहील. यामुळे मुलांचे लक्ष, आत्म- नियंत्रण आणि वर्गात सहभाग वाढवणे सोप्पे होते. त्यामुळे तुमची मुले जर तणाव, नैराश्य आणि चिंता इत्यादींना सामोरे जात असतील तर या सजग ध्यानांचा जरूर अवलंब करा.