| |

सर्दी असो वा डोकेदुखी निलगिरीचे तेल देई आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या ऋतुचक्रानुसार हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यात आता कधी हिवाळा तर कधी पावसाळा असे काहीसे वातावरणाचे बिघडलेले गणित आपल्या आरोग्यावर परिणाम करत आहे. अश्या वातावरणामुळे अनेकदा संसर्गजन्य रोगांची भीती निर्माण होते. त्यात जर आपली रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर निश्चितच तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. यात प्रामुख्याने सर्दी, पडसं आणि डोकेदुखी व अंगदुखी अश्या समस्या उदभवतात. याशिवाय थंडीच्या वातावरणात प्रामुख्याने अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास होतो. तर अश्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांसह काही घरगुती उपायांची गरज भासते. आता घरगुती उपाय म्हणून काय करालं? तर मित्रांनो निलगिरीचे तेल हे असे तेल आहे जे सामान्य वाटत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला निलगिरीचे तेल वापरण्याचे प्रमुख आणि आश्चर्यचकित करणारे फायदे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) संसर्गाची भीती दूर – तज्ञांच्या अभ्यासानुसार, निलगिरीच्या तेलात असणारे औषधी गुण हे जीवाणू, विषाणू , बुरशी आणि संसर्ग पसरविणाऱ्या सूक्ष्म जीवांशी लढण्यास सक्षम असतात. यामुळे आपल्या रोग प्रतिकार शक्तीत वाढ होते आणि परिणामी संसर्गाची भीती वाटत नाही. तसेच निलगिरी तेलाचा वापर पायाच्या नखांच्या बुरशीविरूद्ध अँटी-फंगल एजंट म्हणूनदेखील सहाय्यक आहे.

२) असह्य डोकेदुखीवर फायदेशीर – अचानक होणारी डोकेदुखी हि कधी कधी असह्य असते. अशावेळी निलगिरी तेल हा उत्तम उपाय आहे. तसेच हे सायनसचा त्रास कमी करण्यासाठी देखील फायदेशीर तेल आहे. निलगिरीचे तेल मानसिक सक्षमता वाढवते आणि ताण तसेच तणाव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना आराम देते. शिवाय ताणल्या जाणाऱ्या स्नायूंना आराम मिळतो. परिणामी डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखे वाटते. शिवाय ताण तणावातुन सुटका मिळते आणि आपोआपच डोकेदुखी थांबते.

३) शारीरिक वेदना आणि सुजेवर परिणामकारक – निलगिरीच्या तेलात कोणतीही शारीरिक वेदना कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची ताकद आहे. यामुळे स्नायुदुखी, शारीरिक वेदना, अवयवांवर आंतरिक वा बाह्य सूज, घसा खवखवणे अश्या समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय काही अभ्यासानुसार, ज्यांना श्वसनसंबंधित समस्या आहेत अश्यानी नीलगिरी तेलाचा वापर केल्यास श्वास मोकळा होतो आणि वेदना कमी होऊन आराम मिळतो.

४) जखमांवर प्रभावी – निलगिरीच्या तेलामध्ये अँटि मायक्रोबियल आणि अँटि सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर कोणतीही जखम वा जळजळ होत असेल तर त्यावर प्रभावी उपाय म्हणून निलगिरी तेलाचा वापर केला जातो. निलगिरी तेलाचा उपयोग त्वचेवर फोड येणे, कापणे, चिरणे, जखमांचे व्रण, ओल्या जखमा, खरूज, पुळ्या ,पुटकुळ्या, तळव्यातील जखमा, बुरशीयुक्त पाय, नखांची सूजआणि बॅक्टेरिया डर्माटायटीस अश्या प्रत्येक समस्येवर प्रभावीरीत्या कार्य करते.