The benefits of chawli in your diet

चवळी चे आपल्या आहारातील फायदे

हॅलो  आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या दररोज च्या आहारात काही विशिष्ट पदार्थाचा समावेश असला पाहिजे. आरोग्य जर व्यवस्थित राहण्यासाठी आपण दररोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम हा केला गेला पाहिजे. कारण जर आपण व्यायाम नाही केला तर मात्र आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी शरीरासाठी योग्य प्रकारचा व्यायाम , आहार आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

दैनंदिन जीवनात आपण नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. घरगुती पदार्थांचा त्यात समावेश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. परंतु अनेक पदार्थांची पुरेपूर माहिती आपल्याला माहीत नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कोणत्या आजार बरा करण्यासाठी कोणते पदार्थ खावे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे घरातल्या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक कडधांन्यांचा समावेश करत असतो. मग त्यात मटकी आणि मूग यांचा साधारणपणे जास्त वापर होत असतो. त्यांच्यापैकीच एक आहे चवळी. चवळीच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यापैकी अनेक फायदे आपल्याला माहीत नाही. चवळीच्या आहारात समावेश केल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. त्यामुळे चवळी आवडणार नाही असे कमीच लोकं सापडतील. चवळीची उसळ तसेच मिसळ देखील चविष्ट लागते.

–– चवळीमधून भरपूर प्रमाणात कॅलशियम मिळत असल्याने जेवणात तिचा समावेश करणे लाभदायक ठरते.

–– पोट साफ होण्यास देखील चवळीचा फायदा होतो. चावळीमध्ये सोल्युबल फायबर असतात. फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पचनशक्ती सुधारते.

–– चवळी शरिरातील वाईट कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

– गरोदरपणात कॅल्शियम  ची होणारी झीज चवळी भरून काढते आणि बाळाची नीट वाढ होण्यात मदत करते. त्यामुळे प्रसूती ला त्रास कमी होतो, आणि तसेच बाळाच्या जन्मानंतर आईला भरपूर दूध येण्यासाठी देखील अतिशय उपयोगी असते.

–– चवळी शरिरातील लोह वाढवते. तसेच कॉलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात ठेवण्यात चवळी मदत करते.

— हृदयशी निगडित आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते.