| | |

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत अमर्याद फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : लिंबू पाणी पिणे उन्हाळ्यात अमृतासमान आहे. उष्णतेने शरीरातील पाणी घामाद्वारे कमी होते. वेळेचे वेळी पाणी प्यायल्यास उन्हाळ्यातील डिहायड्रेशन समस्या दूर करण्यास मदत होते.  उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या काळात, आम्लपित्त, मळमळ किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत ही लिंबू पाणी प्रभावी मानले जाते.  उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लिंबूपाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचेची सुंदरता वाढण्यास मदत होते. शरीराला उर्जा मिळते. तसेच पचन संस्था देखील उत्तम राहते. लिंबूपाण्याचा दैनंदिन जीवनात पेयजलांमध्ये समावेश केलाच पाहिजे.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते : 

रोज सकाळी उठल्यानंतर गरम कोमट पाण्यात लिंबू टाकून पिल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. व आपली रोग प्रतिकारक शक्ती (Immunity Power)देखील वाढते.  लिंबू हा व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे. कोमट पाण्यात निंबू  टाकून पिल्याने आपल्या शरीरातील पी.एच स्तर नियंत्रित राहतो. तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

  • पचनक्रिया सोपी होते :

लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे पचनसंस्थेमधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. यासाठी रोज लिंबू पाणी प्यायले पाहिजे. लिंबू पाण्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो. अ‍ॅसिडिटी-गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो. याने पोटात होणा-या जंतुसंसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. लिंबात व्हिटॅमिन सी आणि एसकॉरबिक अ‍ॅसिड असते. याने पोट साफ राहण्यास मदत होते. यामध्ये अ‍ॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व असल्याने पोटात असणा-या बॅक्टेरियापासून रक्षण होते तसेच सर्दी-खोकला होत नाही.

  • जखम लवकर भरते :

लिंबात भरपूर प्रमाणात एसकॉर्बिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे अंग भाजल्यावर किंवा कापल्यानंतर आणि एखादी जखम झाल्यानंतर ती लवकर भरुन निघण्यासाठी लिंबाचा फायदा होता. लागलेल्या ठिकाणी लिंबाचे 2 थेंब टाकल्यास लवकर आराम मिळतो.

  • ऊर्जावृद्धी :

लिंबात जीवनसत्वे आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. साइट्रस असणारे फळे (आंबट फळे)शरीरातील उर्जा वाढवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवत नाही.

  • किडनी स्टोन पासून आराम मिळतो :

लिंबात अनेक तत्व उपलब्ध असतात ज्यामुळे शरीरातील खास करुन पोटातील विषारी तत्व नाहिसे होतात. लिंबू पाणी पिण्याने शरीरातील रक्त साफ होते. यूरिनशी निगडित समस्येपासून आराम मिळण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायद्याचे ठरते.लिंबामुळे पित्त, किडनी स्टोन पासून आराम मिळतो.

  • त्वचेसाठी फायदेशीर (Healthy For Skin):

लिंबात भरपुर व्हिटॅमिन उपलब्ध असतात. यामध्ये बरेच अ‍ॅन्टी-ऑक्सीडेंट्स असल्याने त्वचा नितळ व तजेलदार राहते. यामुळे चेह-यावरील डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. गरम पाण्यात लिंबू टाकून पिल्यामुळे आपली त्वचा चमकदार व मुलायम राहते. लिंबू पाणी पिण्याचे फायदे मुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या व पिंपल्स येत नाही. लिंबू पाणी पिणे आपल्या शरीरासाठी कधीही फायदेशीरच आहे. लिंबू पाणी चे सेवन नियमित केल्याने आपले अनेक रोगांपासून बचाव होतो.

  • वजन कमी करण्यास मदत करते (Helps to loose weight)

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी लिंबाचा फायदा होतो. त्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे. यामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते.  तुम्हाला जर असं वाटतेय कि तुमचं वजन खूप वाढतंय आणि खूप उपाय करून सुद्धा काही फरक पडत नाही आहे तर तुम्ही रोज सकाळी उठून गरम कोमट पाण्यात निंबू आणि मध एकत्र मिक्स करुन ते पाणी प्यावे. कमीत कमी दोन तीन महिने हा उपाय करुन बघा हयामुळे नक्कीच तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल. लिंबू गरम कोमट पाण्यामध्ये टाकून पील्याने आपली शरीरातील व पोटाची चरबी वितळते त्यामुळेच आपलं वजन देखील कमी होऊ लागते.

  • सर्दी खोकला वर फायदेशीर आहे(Beneficial for cold cough):

कधी कधी वातावरण अचानक बदलते वातावरणात बदल झाल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला सारखे आजार होऊ लागतात. सर्दी होऊन अचानक छातीत कफ तयार होऊ लागतो तसेच घसा बसतो. अश्यावेळी गरम पाण्यात थोडासा लिंबू टाकून पिल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो. गरम पाणी पिल्यामुळे कफ कमी होण्यास मदत होते व घश्याला अराम मिळतो.व लिंबू मध्ये असणाऱ्या सी जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

  • ब्लड सर्कुलेशन चांगले राहते(Blood Circulation remains Good):

गरम कोमट पाण्यात लिंबू टाकून पिल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. गरम पाणी पिल्यामुळे काय होत तर आपल्या शरीरातील तापमान वाढते. शरीरातील तापमान वाढल्यामुळे घाम सुटतो घामावाटे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघून जातात.

  • केसांसाठी फायदेशीर (Good for Hair):

गरम लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या केसांची चमक चांगली राहते. केस चमकदार व मुलायम राहतात व केसांची ग्रोथ देखील चांगली राहते. गरम पाण्याच्या सेवनामुळे केसांची त्वचा डीहायड्रेट होण्यापासून वाचवते. म्हणजे केसांची त्वचा हि नेहमी हायड्रेट राहते व लवकर ड्राय होत होत नाही.

‘हे’ ही लक्षात ठेवा!

लिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा आजार असेल, तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर रहावे. हार्टबर्नला ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे झाल्यास लिंबासह सर्व आम्ल पदार्थांचे कमीतकमी सेवन केले पाहिजे.

जरी लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत, परंतु आपल्याला तोंडात अल्सरची समस्या असल्यास, लिंबू पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे तोंडातील फोड बरे होण्यापेक्षा अधिक गंभीर बनू शकतात. याशिवाय दररोज सकाळी रिकाम्या पोटावर जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन केल्यास तोंडात फोड व गॅस्ट्रोओफेझियल रिफ्लक्स डिसीज या सारखे आजारही उद्भवू शकतात.