The benefits of eating in different types of pots

वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात जेवल्याने असा होतो फायदा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । पूर्वीच्या काळी एकत्र राहणीमान असल्याने, अनेक वेगवेगळ्या प्रकारची भांडी घरात असत . त्यामुळे सगळ्या भांड्यांचा वापर हा केला जात असे. पूर्वीच्या काळी मातीची आणि पितळेची भांडी हि जास्त वापरली जात होती. पितळेच्या भांड्यात जेवल्याने किंवा कोणत्याही प्रकारचा आहार घेतल्याने शरीराला खूप फायदा होतो. कोणत्या प्रकारची भांडी हि वापरली गेली पाहिजेत हे जाणून घेऊया …

अनेक वेळा घरातल्या मोठ्या लोकांकडून ऐकले असेल कि जर तांब्यांच्या कळशीतून पाणी पिले तर ते शरीराला खूप फायदेशीर असते . पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण इतर भांडी हि वापरू शकता. कोणत्या प्रकारची भांडी ते जाणून घेऊ

—— कांस्याची भांडी

कांस्याच्या भांड्यात जेवल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.या मुळे मेंदू तीक्ष्ण होतो. रक्तविकारात सुधारणा होते. भूक देखील लागते. परंतु लक्षात ठेवा की कांस्याच्या भांड्यात आंबट काही घेणं टाळावे. आंबट पदार्थांमध्ये कांस्य हे विरघळते. त्यामुळे चव बदलते .

— अल्युमिनियम ची भांडी

आजकल सर्वांच्या घरात अल्युमिनियम चा वापर हा केला जातो. कारण ती भांडी लवकर खराब होत नाहीत . पण आयुर्वेदानुसार या भांडीत जेवण करू नये. या मुळे हळू-हळू हाडे कमकुवत होतात आणि पचन तंत्रावर देखील प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे जास्त स्टील चा वापर केला जाऊ नये.

— लोखंडी आणि स्टीलची भांडी

अनेकांना माहित आहे कि , लोखंडी तव्यावर जर तुम्ही भाकरी केली असेल तर ती भाकरी खूप चवदार आणि मस्त लागते . अश्या वेळी भाकरी हि आरोग्यास खूप भारी असते . कोणत्याही प्रकारची भाजी करत असाल तरी लोखंडाचा वापर हा केला जावा. कारण त्याच्यामुळे आयरन ची कमतरता भरून काढण्यास मदत होते .

— तांब्याची भांडी

या भांडीत सकाळी उठून पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदे होतात. या मुळे पोटाचे विकार जसे की गॅस ची समस्या होणं दूर केले जाऊ शकते. या भांड्यातून पाणी प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते आणि लिव्हरचे त्रास दूर होतात. बरेच लोक पाण्यात तुळशीची पाने घालून देखील पाणी पितात.

— मातीची भांडी-

सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. मातीने तयार केलेले भांडी. असं म्हणतात की या मध्ये अन्न शिजवल्यावर आणि खाल्ल्यावर शरीराला काहीच नुकसान होत नाही. शहरात ह्याचा वापर कमी प्रमाणात आढळतो. परंतु गावात आज देखील ह्या भांडीचा वापर सर्रास करतात. या मध्ये अन्न शिजायला वेळ लागते परंतु अन्न पौष्टिक असते. अनेक वेळा गावाकडे जर मोठा कार्यक्रम असेल अश्या वेळी मातीच्या भांड्यांचा वापर हा जास्त करतात.

— सोनं आणि चांदीची भांडी

हि भांडी अतिशय मूल्यवान असतात. त्यामुळे याचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो. पण याच्या मदतीने आपली हाडे हि बळकट होण्यास मदत होते . तसेच मेंदू सुद्धा तीक्ष्ण राहण्यास मदत होते .