The benefits of eating jackfruit

फणसाचे गरे खाण्याचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या आहारात फणसाच्या बियांचा वापर हा जास्त केला जावा. फणसाच्या  बिया  जास्त प्रमाणात आपल्या शरीरासाठी लाभकारक असतात. बिया खाण्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. पहिल्या काळात फणसाच्या  रसाळ फळाबरोबर त्याच्या बिया पण भाजून खात होते . आपल्याला त्या गराचे काय फायदे आहेत ते जणूं घेऊया ….

इन्स्टंट एनर्जी—

फणसाच्या बिया खाल्याने आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच.  तसेच ज्या लोकांच्या शरीरात प्रोटिन्स ची कमतरता आहे. त्या लोकांनी फणसाच्या बिया आणि गरे हे खाल्ले पाहिजेत . त्यामुळे प्रोटिन्स ची कमतरता भरून निघते .

शारीरिक वाढीसाठी चांगले—

लहान मुलांना फणसाच्या बिया खायला दिल्याने शरीराची वाढ हि योग्य पद्धतीने होते. तसेच त्यामुळे मानसिक स्थैर्य सुद्धा लाभण्यास मदत होते. लहान मुलाना नेहमी फणसाच्या बिया या वाळवून आणि उकडून दिल्या जातात . त्यामुळे लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. फणसाचे गरे हे डाळीसोबत खाल्याने शरीराची  वाढ होण्यास मदत होते.

पचनशक्ती वाढण्यास होते मदत —

पचनक्रिया सुरळीत आणि चांगली करण्यासाठी फणसांच्या बिया या फारच फायदेशीर असतात. नियमित सेवन केले तर पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या या निर्माण होत नाहीत . त्या बियांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते . ते पचनशक्ती वाढवण्यास मदत करते . लहान मुलांना जर गरे खायला दिले तर मुलाना होत असलेला बुद्धकोष्ठकतेचा त्रास हा कमी होत जातो.

हाडांना मिळते बळकटी—

फणसाच्या बियांमध्ये पोटॅशियम तसेच मॅगनीज यासारखे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. हाडांना मजबुती हवी असेल तर त्यावेळी सकाळ संध्याकाळ कॅल्शियम च्या गोळ्या खाण्यापेक्षा दररोज एक फणसाचा गर खाल्ला तर लाभकारक ठरते . तसेच फणस हा कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहे .