The benefits of fasting

उपवासाचे असलेले फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । उपवास हा  भारतीय संस्कृतीत  खूप   महत्वाचा मानला जातो .  त्यामुळे  आठवड्यातून एकदा हा असतोच त्या काळात प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे आहार घेत असतात. जरी उपवास हा देवाची श्रद्धा म्हणून करत असतील तरी सुद्धा त्याची वैज्ञानिक कारणे वेगवेगळी आहेत . आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. उपवासाचे सुद्धा अनेक फायदे आहेत . त्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

अनेक लोक हे उपवास तर करतात. पण नेमके उपवासाच्या दिवशी मात्र आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर हा जास्त करतात. त्यामुळे त्या उपवासाला हवे तसे महत्व राहत नाही . त्या काळात सतत खाल्याने उलट आपल्या कॅलरीज वाढतात . उपवास हा आठवड्यातून एकदा आपल्या पोटाला आराम मिळावा यासाठी केला जातो , नेहमी पचनाच्या अनेक समस्या निर्माण होण्यापेक्षा कमीतकमी त्रास हा आपल्या पोटाला झाला जावा . यासाठी उपवास हा केला जातो. तसेच उपवास करताना काही वेळ काही खायचे नसते किंवा पाणी सुद्धा पिण्याचे नसते . कारण जर तुम्ही पाणी किंवा काही खात असाल तर त्यावेळी तुमच्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडणार नाहीत . त्यामुळे काही वेळ तरी तुम्ही निर्जल उपवास केला पाहिजे .

उपवासाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कारण उपवास का सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी सुद्धा कला जातो . सकाळच्या नाश्तापासून ते संध्याकाळ पर्यंत काहीच खाल्ले जात नाही . त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर जास्त परिणाम हा जाणवत नाही. संध्याकाळी उपवास केला असता, फक्त सकाळच्या वेळेतच जेवण केले जाते. त्यामुळे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश हा केला जावा.