The benefits of having figs in the diet

आहारात अंजीर खाण्याचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । शरीराची स्किन जर खूप सुदंर ठेवायची असेल तर त्यावेळी आहारात योग्य पदार्थाबरोबर आहारात योग्य फळाचा समावेश असणे गरजेचे असते. आपल्या आहारात जर योग्य फळांचा समावेश केला तर त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत पण होते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अंजीर मध्ये पिष्टमय पदार्थाचा समावेश हा या जास्त असतो. तसेच त्याबरोबर प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ याचा हा पण समावेश असतो. आहारात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व याचे प्रमाण भरपूर असेल तर त्यावेळी आपल्याला ऊर्जा मिळते.

अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.

—- अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.

— अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.

— कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.

— आहारात जर पिकलेलं अंजीर ठेवले तर त्याने पित्तनाशकाचा त्रास हा कमी कमी होत जातो.

— पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, रक्तवर्धक असतो.

— अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ हे जास्त असतात. त्यामुळे पचनाच्या समस्या या कमी कमी होत जातात.

— अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.

— शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी अंजीर हे लाभकारक आहे.

— अंजीराच्या सेवनाने क्षयरोगासारखे आजार बरे होऊ शकतात.

—अंजीराचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.

—- अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.

—- कच्च्या अंजीराचा चीक  जखमांना लावावा.