| | |

काळे तीळ देतात निखळ सौंदर्य; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। काळे तीळ हे काळ्या रंगाचे बारीक बियाणे असते. जे अन्न पदार्थांमध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्याचे झाड सुमारे १२ इंच मोठे असते. हे प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम आशियात आढळते. याला कलौंजी म्हणून देखील ओळखले जाते. तर बिहारच्या भागात याला मंगरेला म्हणून ओळखतात. काळे तीळ भारताव्यतिरिक्त बांगलादेश आणि पाकिस्तानमध्येही खाल्ले जाते. तसेच काळ्या तिलाच समावेश औषधांतदेखील केला जातो. कारण काळ्या तिळात असे अनेक औषधी घटक समाविष्ट आहेत, ज्यांच्या साहाय्याने आपले शारीरिक, मानसिक आणि त्वचेचे आरोग्य राखता येते. यामुळे दररोज किमान २ ग्रॅम काळे तीळ असेच किंवा भाज्या, कोशिंबीरी, चपाती, पुलाव आणि इतर अनेक पदार्थांमध्ये मिसळून खाणे लाभदायक आहे.

काळ्या तिळाचा सौंदर्य प्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. कारण काळ्या तिळात लोह, सोडियम, पोटॅशियम, फाइबर आणि बरेच खनिजे असतात. यात अमिनो एसिड देखील असते. याव्यतिरिक्त, हे शरीरात आवश्यक प्रथिने देखील प्रदान करते. त्याचे तेल देखील तयार केले जाते आणि हे तेल त्वचेसाठी व केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. यात अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. चला तर जाणून घेऊयात काळ्या तिळाचे सौंदर्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) जर आपल्याला मुरुम किंवा पिग्मेंटेशन सारख्या समस्या त्रास देत असतील तर आपल्याला काळे तीळ अत्यंत लाभदायक आहेत. कारण काळ्या तिळांमध्ये अँटी – मायक्रोबियल गुणधर्म असतात. शिवाय एंटी – इंफ्लेमेटरी देखील आहेत. यासाठी काळ्या तिळाच्या तेलामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी, संध्याकाळी चेहऱ्याला लावा. असे केल्यास चेहऱ्यावरील डाग मिटतात आणि चेहरा सुंदर दिसतो.

२) जर आपल्याला टाचदुखी किंवा टाच चिरणे, फाटणे, त्वचा निघणे अश्या समस्या जाणवत असतील तर काळ्या तिळाचे तेल लावावे. यामुळे त्वचा मुलायम होते आणि टाच सुंदर होण्यास मदत होते.

३) तेलकट वा कोरडी त्वचा यासाठी काळे तीळ लाभदायक आहेत. यासाठी १ चमचा काळ्या तिळाची पावडर, १ चमचा ओट्स, १/२ चमचा मध, १/२ चमचा बदाम तेल आणि १ चमचा दुधाची क्रीम मिसळून हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. यामुळे त्वचेला कोणताही त्रास जाणवत नाही.

४) काळे तीळ चेहऱ्यावरील टैनिंग काढून टाकण्यासदेखील उपयुक्त ठरते. यासाठी २ चमचे बडीशेप पावडर, १ चमचा संत्र्याचा रस, ५ थेंब लिंबाचे तेल घाला आणि नंतर ते चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा धुवा. आठवडाभर हा प्रयोग केल्यास चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसेल.

५) तेल केस गळतीपासून बचाव करण्यासाठी काळ्या तिळाचे तेल वापरावे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. जे केस गळण्यापासून बचाव करतात आणि त्यांना मजबूत करतात. म्हणून, काळ्या तिळाचे तेल दररोज टाळूवर घाला आणि आठवड्यातून एकदा काळ्या तिळाची पेस्ट केसांना लावा.

६) लांब आणि घनदाट केसांसाठी आठवड्यातून एकदा काळ्या तिळाचे तेल केसांना टाळूपासून लावावे. तसेच आपणास हवे असल्यास या तेलात कापूरही मिसळू शकता.

७) केस कंडीशनिंगसाठीदेखील काळे तीळ फायदेशीर आहेत. हे डोक्यात आर्द्रता राखते. म्हणून, ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी काळ्या तिळाचे तेल वापरावे. यामुळे केस मुलायम होतील.