forhead

कपाळावरील काळपटपणा ‘असा’ केला जातो कमी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  कपाळावर काळे डाग असतील तर तो काळा डाग लगेच उठून दिसायला सुरुवात होते . आपण जर खूप जास्त प्रमाणात बाहेर आणि धुळीत फिरत असू तर त्यावेळी आपल्या कपाळावर खूप जास्त प्रमाणात घाण साचते त्यामुळे कपाळ हे काळे पडायला सुरुवात होते . वेगवेगळ्या प्रसाधांचा वापर हा आपल्या कपाळावर होत असेल तर त्यावेळी मात्र कपाळ हे काळे   होते . त्यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते .अशा वेळी घरगुती  कोणते उपाय करू शकता.  ते जाणून घेऊया …

कपाळावरचे काळे डाग दूर करण्यासाठी आणि कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी नारळाचे पाणी हे फार प्रभावी ठरते . नारळाच्या पाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल नसते . त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी आणि चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी मदत करू शकते . ते काढत असताना काही प्रमाणात मध आणि नारळाचे पाणी मिक्स करून घ्या . त्यानंतर ते पाणी कापसाच्या मदतीने दररोज सकाळ आणि संध्याकाळ लावा. काही दिवसांतच कपाळावरील काळे डाग हे कमी दिसतील .

कच्चा बटाटा हा जर आपल्या त्वचेला लावला तर मात्र तुमच्या त्वचेचा काळेपणा दूर होतो. कच्या बटाटा यामध्ये जास्त प्रमाणात आयोडीन असते . मध आणि साखर सुद्धा काळ्या डागांसाठी लावली जाते . दूध आणि गुलाब पाणी हे आपल्या त्वचेला लावल्याने  कपाळावरील काळा डाग हा दूर होतो. काकडीचा रस हा थंड असतो तो आहारात घेतला पण जातो. त्याच बरोबर त्याचा वापर हा कपाळावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केला जातो. बदामाचे तेल सुद्धा खूप फायदेशीर आहे .