| | |

रोजच्या डाएटमध्ये असतील ‘हे’ पदार्थ तर मॅन होतील सुपरमॅन; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजची धावपळ, कामावर जायची गडबड, बॉसला खुश ठेवण्याची धडपड या सगळ्यात अनेकदा आपण आपल्या आरोग्यासोबत जरा दुजाभावच करतो. एखादी आरोग्यविषयक समस्या जी आपल्याला समजत असते पण तरीही आपण जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि उपचारांना टाळाटाळ करतो. मित्रांनो, हे असं किती दिवस? तुम्ही जगताय? का दिवस ढकलताय? आजकाल महिला असो वा पुरुष प्रत्येकाला काही ना काही आरोग्याच्या तक्रारी आहेतच. यासाठी आपल्या रोजच्या दिनचर्येत एक छोटासा बदल फार गरजेचा आहे. कारण तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे.

अनेकदा पुरुष आपल्या जबाबदाऱ्यांपुढे आरोग्याच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. अश्यावेळी मैत्रिणींनो तुम्ही थोडा पुढाकार घ्या आणि स्वतःसोबत त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्या. कारण पुरुषांच्या शरीराला विशेष पोषक तत्वांची आवश्यकता असते. आजकाल चुकीची आहार पद्धती आणि जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग, हृदय विकार, हाय कोलेस्ट्रॉल, शुगर, ब्लड प्रेशर आणि सेक्शुअल हेल्थ यांच्याशी संबंधीत अनेक प्रकारच्या समस्या दिसून येत आहेत. अशावेळी या आजारांपासून वाचण्यासाठी पुरुषांनी डाएटमध्ये काही निवडक पदार्थांचा समावेश जरूर करा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) दूध आणि दही – पुरुषांच्या सुदृढ आरोग्यासाठी दूध आणि दही हे प्रोटीनयुक्त, कॅल्शियम आणि ल्यूटिनचा उत्तम स्त्रोत असणारे पदार्थ डाएटमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. कारण दुधात अमीनो अ‍ॅसिड आणि दह्यात प्रोटीन, पोटॅशियम आणि गुड बॅक्टेरिया असतो. जो शरीरासाठी लाभदायक आहे.

२) ताजा पालक – ताजा पालक पुरूषांच्या संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे. पालकमधील मॅग्नेशियममुळे शरीरातील रक्तवाहक पेशी सक्रिय होतात. शिवाय रक्त पातळ होतो आणि रक्त संचरण व्यवस्थित होते.

३) हिरव्या पालेभाज्या – पुरुषांनी आपल्या दैनंदिन आहारात कोणत्याही हिरव्या मात्र ताज्या पालेभाज्या खाणे फायदेशीर आहे. यामुळे डोळे आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते. शिवाय यामुळे मोतीबिंदू आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

४) नारंगी भाज्या – पुरुषांच्या आहारात नारंगी भाज्या असतील तर त्यांची दृष्टी चांगली होते. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. या भाज्यांमध्ये गाजर, भोपळा, बीट आणि लाल मिरचीचा समावेश करा.

५) अवोकाडो – पुरुषांनी आपल्या आहारात शरीराला हेल्दी फॅट मिळावे म्हणून अवोकाडोचा समावेश करावा. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढते.

६) सोया फूड – तज्ञांच्या रिसर्च रिपोर्टनुसार सोया फूड्स पुरुषांसाठी लाभदायक आहे. शिवाय हेदेखील सिद्ध झाले आहे कि, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. एस्ट्रोजन हार्मोन वाढतात. म्हणून पुरुषांच्या आहारात सोयाबीन, टोफू, सोया दूध आणि मीसो सूपचा समावेश करा.

७) अंडे – पुरुषांनी उकडलेली अंडी खाणे एकदम उत्तम. कारण अंड्यामध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि ल्यूटिन असते.

८) फॅटी फिश – पुरुषांचे हृदय निरोगी राखायचे असेल तर यासाठी त्यांच्या आहारात फॅटी फिश असणे आवश्यक आहे. यासाठी ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असलेले सॅलमन, हेरिंग, सार्डिन आणि हलिबेट मासे खा.

९) नट्स आणि सीड्स – नट्स आणि सीड्समध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट असते जे पुरुषांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्त गोठत नाही आणि प्रोस्टेट व कोलनच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

१०) डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट सर्व पद्धतीने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र पुरुषांनी डार्क चॉकलेट खाल्ल्यास शरीरात रक्त संचरण चांगले होते. शिवाय डार्क चॉकलेटमधील फ्लेवनॉलमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच सेक्शुअल हेल्थ सुधारते.