The effects of the corona virus on people's lives

कोरोना व्हायरस मुळे लोकांच्या आयुष्यावर झालेले परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  काही महिन्यांपासून सगळीकडे कोरोनामुळे वातावरण खूप बिघडले आहे. कोरोनाच्या काळात सर्वानी काळजी हि घेतली पाहिजे. कारण कोरोना हा संसर्गजन्य असा आजार आहे. त्यामुळे हा आजार एका व्यक्तीला झाला तर दुसऱ्या व्यक्तीला पण होऊ शकतो. अनेक लोक हे एकमेकांच्या संपर्कांत आल्याने सुद्धा हा रोग होण्याची शक्यता हि अधिक असते. जवळपास १० महिन्यांनी कोरोनाचा आपल्या आरोग्यावर आणि आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम झाला आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

सर्दी, पडसं सारखे आजारही एकमेकांच्या संपर्कात येऊनच पसरतात. कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर खूपच काळजी घ्यावी लागेल. संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या आता काटेकोर पद्धतीने कराव्या लागतील. म्हणूनच जगभरात लोकांच्या रोजच्या जीवनातील लहानलहान गोष्टींमध्ये बदल झालाय. जसे की, अनेक देशांमध्ये हात मिळवण्यावर बंदी आली आहे. भारतात तर हि प्रथा हि वर्षांपासून सुरु झाली होती. पण आता हात हातात घेऊन भेटी घेणे यावर सुद्धा बंदी आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून काही देशांमध्ये गालावर चुंबन घेऊन स्वागत करण्याची प्रथा हि निर्माण झाली आहे.

चीन—

चीनमध्ये कोरोना व्हायरस चे उगम झाले आहे. त्याच देशात हात मिळवणे यावर बंदी आली आहे. गोंग शु पद्धतीत एका हाताची मुठ दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवून अभिवादन केलं जातं.

फ्रान्स—-

फ्रान्समध्ये अभिवादन करताना गालावर हलकेच चुंबन घेतलं जातं. तुम्ही जर पहिल्यांदाच भेटत असाल तरी याचप्रकारे अभिवादन केलं जातं. संसर्ग होऊ नये म्हणून अनेक प्रकारची काळजी घ्या असे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे.

ब्राझील—-

ब्राझीलच्या आरोग्य विभागाने लोकांना सल्ला दिला आहे की त्यांनी इतरांनी वापरलेले स्टीलचे स्ट्रॉ वापरू नये. त्याचं असं आहे की ब्राझीलमध्ये चीमारो नावाचं पेय प्रसिद्ध आहे. हे पेय स्टीलच्या स्ट्रॉ ने प्यायलं जातं. बरेचदा एका व्यक्तीने वापरलेला स्ट्रॉ दुसरा व्यक्ती वापरतो. त्यामुळे अश्या स्ट्रॉवर ब्राझील मध्ये बंदी घातली आहे.

स्पेन—-

स्पेनमध्ये हाताचे किंवा पायाचे चुंबन घेण्याची प्रथा निर्माण झाली आहे.

रोमेनिया—-

रोमेनियाच्या सरकारने म्हटलंय की एकमेकांना फुले आणि दोरे द्या पण सोबत चुंबन देऊ नका.

पोलंड—-

पोलंडमध्ये विशेषतः कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतात. जुन्या परंपरेनुसार लोक एकत्र येऊन एकत्रच तयार केलेला ब्रेड खातात. कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे ब्रेड न खाता तो फक्त हातात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याखेरीज चर्चमध्ये गेल्यावर पाण्यात हात बुडवू नये असाही सल्ला देण्यात आला आहे.

इराण—-

इराणी लोक हे एकमेकांच्या पायाला पाय लावून त्याचे स्वागत करत आहेत.

न्यूझीलंड—-

न्यूझीलंडमध्ये अभिवादानासाठी दोन माणसं एकत्रितपणे एकमेकांचं नाक दाबतात. याला माओरी म्हटलं जातं. सध्या या पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया—-

ऑस्ट्रेलियामध्ये एकमेकांना भेटताना सहजच हात पुढे केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्र्यांनी असा सल्ला दिला आहे, की हात मिळवण्यापेक्षा लोकांनी एकमेकांची पाठ थोपटावी. आणि हो चुंबन घेताना सावधगिरी बाळगा.

युएई—

युनायटेड अरब एमिरेट्समध्ये एकमेकांच्या नाकाला स्पर्श करून अभिवादन करण्याची पद्धत आहे. युएई च्या सरकारने म्हटलंय की लोकांनी एकमेकांना हात हलवून अभिवादन करावं.

कोरोनाच्या काळात अशी घ्या काळजी —

. — लोकांशी जवळचा संबंध टाळा. विशेषतः आजारी व्यक्तींना स्पर्श करणे टाळा.

— वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.

— पुरेसं पाणी प्या.

—  क जीवनसत्व घ्या. संत्री आणि लिंबातून क जीवनसत्व मोठ्याप्रमाणात मिळतं, तसेच गाजर, सफरचंद, अननस आणि भाजांमध्ये कोबी, पालक, कांदे यामधूनही क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं.

— पुरेसा व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा.