| |

डोकेदुखीच्या असह्य वेदना चुटकीसरशी गायब करा; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन | डोकेदुखी अत्यंत साधारण वाटणारा आजार असला तरीही ह्याच्या वेदना अक्षरशः असह्य असतात. मुळात डोकेदुखी का होते? याची कारणे काय? सुरुवात इथून असते. जर आजाराचे कारण माहित नसेल तर उपाय काय करणार नाही का? तर डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. यात मुख्य कारण म्हणजे, चुकीची जीवनशैली, बराच वेळ पोट रिकामी ठेवणे, उपाशी पोटी कॅफिनचे सेवन करणे, अपूर्ण झोप, अवेळी चुकीच्या पदार्थांचे सेवन आणि आणखी बरच काही…. ही डोकेदुखी अशी असते की तिला काहीही काळ वेळ नसतो. अनेकदा ती अचानक उद्भवते आणि अचानक थांबते. अश्या अकाली डोकेदुखीवर उपाय काय करायचा असा मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची कोणतीही डोकेदुखी अशी चुटकीसरशी गायब होईल.

१) आल्याचा वापर गुणकारी.
– आल्यामुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी होते. त्यामुळे आयुर्वेदातही आल्याच्या गुणांचे कथन केलेले आहे. डोकेदुखी च्या कोणत्याही वेदनेवर आल कमी वेळात अधिक आराम देण्याचे काम करते.
उपाय १ – यासाठी १ टीस्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र मिसळून घ्यावा. हे मिश्रण दिवसातून दोनवेळा घेतल्याने डोकेदुखी दूर पळते.
उपाय २ – यासाठी आल्याची १ चमचा पेस्ट २ चमचे पाण्यात मिसळून कपाळावर लावावी आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी. यामुळे लगेच आराम मिळतो.

२) लवंग करेल कमाल.
– अख्खी लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. त्यामुळे डोकेदुखीवर हे गुण परिणामकारक ठरतात.
उपाय १ – यासाठी १० ते १५ लवंगांची बारीक पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घ्यावा. यामुळे डोकेदुखीपासून लगेच आराम मिळेल आणि वेदनाही कमी होतील.
उपाय २ – यासाठी दोन चमचे खोबरेल तेलात १ चमचा मिठ आणि ५ ते ६ थेंब लवंग तेल मिसळा आणि ते हलक्या हाताने आपल्या कपाळाला लावा. पहा तुमची डोकेदुखी कुठच्या कुठे पळून जाईल.

३) दालचिनी अत्यंत परिणामकारक.
– दालचिनी भरपूर औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते. त्यामुळे डोकेदुखी पल इन्यत दालचिनी अतिशय परिणामकारक ठरते.
उपाय १ – यासाठी दालचिनीचे ४ लहान तुकड्यांचे चूर्ण तयार करा आणि त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करून कपाळाला लावा. हा लेप अर्धा तास कपाळावर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे अगदी काहीच क्षणात डोकेदुखीच च्या वेदना पळ काढतात.

४) लिंबूचा प्रभावशाली परिणाम.
– डोकेदुखीला पळविण्यासाठी लिंबू अतिशय फायदेशीर ठरतो.
उपाय १ – यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा २ चमचे रस आणि हॉकी चिमुट सैंधव मीठ मिसळून प्यावे. यामुळे डोकेदुखीचा त्रास मिटतोच, शिवाय गॅसेसचा त्रासदेखील होत नाही आणि अपचनापासून मुक्ती मिळते.

५) आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय ओवा.
– सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीच्या वेदना वारंवार जाणवत असतील तर यासाठी ओवा अगदी रामबाण उपाय आहे.
उपाय १ – यासाठी १ चमचा ओवा भाजून सुती कपड्यात बांधा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेक द्या. यामुळे डोकेदुखीचा त्रास मिनिटात कमी होतो. हा उपाय ‘आजीबाईचा बटवा’ याच्या माध्यमातून अनेक वर्षे वापरात आहे.