|

पारिजातकाचा केवळ सुगंध करतो ‘या’ आजारांना नियंत्रित; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निसर्गात काही फळे, फुले आणि झाडे अशी आहेत जी अनेको आजारांवर अत्यंत प्रभावी आहेत. मात्र फरक इतकाच कि हे आपल्या रोजच्या पाहण्यात आणि वापरण्यात नसल्यामुळे त्यांचा उल्लेख होत नाही. यापैकीच एक म्हणजे पारिजातक. पारिजातकाच्या झाडाबाबत आपण पुस्तकांमध्ये आणि कवितांमध्ये ऐकलं किंवा वाचलं असेलच. पण या झाडाचा उपयोग आपल्याला माहित आहे का? ‘ह्या’ फुलांचा केवळ सुगंधदेखील काही आजारांवर गुणकारी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारिजातकाच्या फुलांचे फायदे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात पारिजातकाचे चमत्कारिक गुणधर्म –

१) पारिजातकाच्या फुलांमध्ये ताण दूर करण्याची शक्ती असते. त्यामुळे पारिजातकाचा सुगंध जीवनात आनंद आणि उत्साह भरतो. परिणामी मेंदूवरील ताण दूर होतो आणि मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत चालते.

२) पारिजातकाच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे, हि फूले रात्री उमलतात आणि सकाळी कोमजतात. त्यामुळे अशी आख्यायिका आहे की पारिजातकाला स्पर्शमात्र केल्याने अंगातला सर्व थकवा दूर होतो. शिवाय पारिजातकाचा सुगंध शरीरातील कार्यकप्रणालीस चालना देण्यास सक्षम असतात.

३) कोणत्याही प्रकारचा ज्वर पारिजातकाच्या पानांचा चहा प्यायल्याने कमी होण्यास फायदा मिळतो. अगदी डेंग्यूच्यापासून ते मलेरिया, चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापावर पारिजातक प्रभावी आहे.

४) मांड्या आणि पोटऱ्यांमधील शिरांवर ताण येऊन वेदना होणे, यास सायटिकाची समस्या म्हणून ओळखले जाते. हि समस्या अत्यंत वेदनादायी असते. यासाठी २ कप पाण्यात पारिजातकाची सुमारे ८ ते १० पाने मंद आचेवर पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. यानंतर हे पाणी थंड करून सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी प्या. यामुळे आठवड्याभरात फरक जाणवेल.

५) पारिजातकाची पाने मूळव्याधीसाठी उत्तम औषध मानले जाते. यासाठी पारिजातकाच्या बियांची पेस्ट बनवून व्याधीच्या ठिकाणी लावावे. यामुळे लवकर आराम मिळतो.