| |

किचनमधील गॅसची ज्योत आरोग्यावर करते गंभीर परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुदृढ आरोग्यासाठी पोटभर अन्न हवं आणि अन्न बनविण्यासाठी घरात गॅस शेगडी हवी. जी प्रत्येकाच्या घरात आढळते. पण या गॅस शेगडीची ज्योत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते हे कितीजण जाणतात..? साधारण हि ज्योत निळ्या रंगाची व वरच्या टोकाला किंचित पिवळ्या रंगाची असते आणि ती अशीच असायला हवी. पण जर हि ज्योत निळसर रंगाऐवजी पिवळ्या – केशरी रंगाची असेल तर ते स्वयंपाकघरात काम करणा-या वा वावरणार्‍या व्यक्तींच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करते. कारण जेव्हा गॅसची ज्योत पिवळ्या – केशरी रंगाची असते, तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू बाहेर पडतो. ज्यामुळे स्वयंपाकघरात वावरणा-या व्यक्तीच्या श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरात हा वायू जातो आणि याचा भयंकर विषारी परिणाम होतो.

कार्बनमोनॉक्साईड हा वायू व्यक्तीच्या श्वसनावाटे फुफ्फुसांमध्ये आणि तिथून रक्तात शिरुन ऑक्सिजनपेक्षा २१० पट वेगाने हिमोग्लोबिनशी संयुक्त होतो. यामुळे हेमोग्लोबिनची शरीर – कोषांना ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता घटते. यामुळे शरीर-कोषांना ऑक्सिजन कमी मिळतो. परिणामी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीराच्या पेशींना जोमाने कार्य करता येत नाही आणि शरीर पेशी क्षीण होतात. महत्वाचे म्हणजे, शरीरात शिरलेला कार्बन मोनॉक्साईड ४-६ तास शरीरामध्ये राहतो.

० कार्बनमोनाॅक्साईड अतिप्रमाणात शरीरात गेल्याची प्रत्यक्ष लक्षणे –
१) श्वास घेण्यास त्रास होणे,
२) डोकेदुखी,
३) मनाचे अस्वास्थ्य,
४) निर्णयक्षमतेमध्ये बिघाड,
५) मळमळ,
६) उलटी,
७) चक्कर व बेशुद्धी.

० गंभीर परिणाम –
१) फ़ुफ़्फ़ुसांना सूज,
२) मेंदुला सूज,
३) श्वसन कार्य मंदावणे,
४) ह्र्दयाच्या कार्यात बिघाड,
५) हार्ट अटॅक.

० महत्वाचे :-
– गॅसच्या ज्योतीमधून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड दीर्घकाळ संपर्कात आल्यास हि लक्षणे आणि परिणाम होऊ शकतात. यात प्रामुख्याने लक्षात न येणार आजार म्हणजे, रोग-प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि शारीरिक तसेच मानसिक अशक्तपणा येणे. त्यामुळे वेळोवेळी घरातल्या गॅस शेगडीचे नीट निरिक्षण करा आणि कळत नसेल तर संबंधित व्यक्तींकडून तपासून घेऊन दुरुस्ती करून घेत चला.