The head is constantly itching

डोक्याला सतत खाजवू वाटतंय

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  अनेक वेळा आपल्या कामाच्या व्यापात असताना सुद्धा आपला हात हा अचानक आपल्या डोक्यात जातो. आणि खाजवण्याची इच्छा निर्माण होते. आपल्या डोक्याला खाज कधी निर्माण होते , तर ज्यावेळी आपल्या केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण हे अधिक असते, अश्या वेळी खाजवावेसे वाटते. तसेच ज्यावेळी केसांमध्ये उवा असतील त्यावेळी सुद्धा सतत खाजवावेसे वाटते, पण त्याच्यावर साधारण कोणते उपाय करणे अपेक्षित आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात….

— केसांसाठी कडुलिंबाचा रस काढून आणून तो आपल्या केसांना लावा. त्यामुळे सगळा कोंडा आणि उवा सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. सगळ्या डोक्याच्या भागात कडुलिंबाचा रस लावून घ्या. त्यानंतर काही ठराविक वेळानंतर सगळे केस स्वच्छ थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याच्या साह्याने आपल्या केसांचा कोंडा हा दूर होते.

— कधी कधी आपल्या डोक्याची त्वचा हि फार कोरडी पडलेली असते अश्या वेळी खोबरेल तेल आणि कापराची वडी घेऊन आपल्या डोक्याला लावा . त्याने त्वचा हि कोरडी पडणार नाही आणि त्यामुळे कोंडा हा जास्त प्रमाणात बाहेर येणार नाही.

— कोरफडीचा गर हा चेहऱ्यासाठी आणि आपल्या केसांच्या मुळ्या साठी सुद्धा फार लाभकारी आहे. केसांच्या खोलपर्यंत जर आपण कोरफडीचा गर वापरला तर कोंडा आणि खाजवायचे प्रमाण हे कमी कमी होत जाते.