| | |

गरम पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल वाढते प्रदूषण हेच आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यात बदलती जीवनशैली आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेवर परिणाम करीत असते. यामुळे अनेको आजार अगदी सहज आपल्या आरोग्याचा ऱ्हास करण्यास सक्षम भूमिकेत असतात. त्यामुळे सारखेच डॉक्टरकडे जाणे होते. या दरम्यान आजार कोणताही असला तरीही डॉक्टर गरम पाणी पिण्याचा सल्ला हमखास देतात, याकडे कधी आपण आपले लक्ष केंद्रित केले आहे का? तुम्हाला कधीच असा प्रश्न पडला नाही का कि गरम पाणीच का? तर चला या प्रश्नच उत्तर आम्ही तुम्हाला देतो.

– मुख्य म्हणजे गरम पाणी पचनशक्ती सुधारून बंद नाकाला पुन्हा सुरू करण्यापासून प्रत्येक आजारपणात आपल्या शरीराला आराम देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी. तसेच रात्री झोपतानाही गरम पाणी पिऊन तासाभराने झोपी जावे असे घातले मोठे सांगतात. शिवाय गरम पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दीसारखे आजार दूर होतात. त्यामुळे घरगुती उपायांपैकी एक म्हणजे गरम पाणी पिणे. चला तर जाणून घेऊयात गरम पाणी पिण्याचे फायदे:-

१) बंद नाकाच्या तक्रारींपासून सुटका.
– गरम पाणी पिताना त्यातून जी वाफ आपल्या शरीराला मिळते त्यामुळे बंद नाकाची तक्रार दूर होते. यासाठी पाणी पिताना ग्लास अशा पद्दतीने पकडा की, त्या पाण्याची वाफ आपल्या घशापर्यंत जाईल. कारण गरम पाण्याची वाफ श्वासावाटे घशात गेल्याने सायनस व त्यामुळे होणारे आजार, तसेच तीव्र डोकेदुखी हळूहळू थांबते. शिवाय गरम पाणी घशातून जाताना घशात होणारी खवखव किंवा सर्दीमुळे झालेली जखम बरी होते. याशिवाय गरम पाण्यात विक्स किंवा कोबीची पाने टाकून त्याचा वाफारा घेतल्यानेही निश्चितच आराम मिळतो.

२) अपचनाच्या तक्रारी दूर होतात.
– आजकाल बदलती जीवनशैली आणि खानपान पद्धती यामुळे अपचनाचा त्रास अनेकांना होतो. त्यात वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चूकीच्या वेळा, व्यसन, अस्वच्छता, अपुरी झोप ही सर्व कारणे या तक्रारींना कारणीभूत असतात. पण पाण्याच्या मदतीने माणसाची पचनक्रिया सुरळीत सुरू असते. कारण, जेव्हा पाणी पोटामध्ये आणि आतड्यांमध्ये फिरते तेव्हा पचनक्रिया चांगल्या प्रकारे हायड्रेट होऊन पोटातील अनावश्यक गोष्टींचा निचरा करते आणि त्या गोष्टींना शरीरातून बाहेर फेकण्यास मदत करते. यामुळे पचनक्रियेत अडथळा येत नाही.

३) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
– थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यायल्याने आतड्यांना आक्रसण्यात मदत होते. जेव्हा माणसाच्या शरीरातील आतड्यांमध्ये फसलेल्या गोष्टी पूर्णपणे शरीराबाहेर फेकल्या जातात तेव्हाच हि प्रक्रिया शक्य आहे. त्यामुळे जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दररोज सकाळी न चुकता गरम पाणी पिणं कधीही चांगलं.

४) शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते.
– एका माणसाला दिवसातून २-३ लीटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक असते. यात सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्याने शरीराला हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न पुरवल्यास अनेक आजारांना आयते मार्ग मिळतात. त्यामुळे दिवसातून ४ ते ५ लीटर रम टेम्प्रेचर पाणी पिण्यापेक्षा गरम वा कोमट पाणी शरीरात जाणं अत्यंत आवश्यक आहे.

५) वजन नियंत्रणात राहते आणि ताण कमी होतो.
– झोपून उठल्यानंतर शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया लगेच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थ निघून जाण्यास मदत होते. तसेच लिंबूमध्ये विटामिन ‘सी’ असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून हलके मध टाकून प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. याशिवाय गरम पाण्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था सुरळीत कार्यरत राहतात. त्यामुळे गरम पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण कमी असते आणि मन शांत असते.