| | |

प्रजनन आरोग्य, हार्मोन्स सोबत ‘या’ गोष्टींसाठी अंजीर ठरतंय वरदान; जाणुन घ्या अंजीर खाण्याचे महत्वाचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. हा पानझडी वृक्ष मूळचा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील  आहे. अंजिराचे चार प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात यूरोपातील ‘सामान्य’ प्रकार येतो. यामध्ये (परागणाशिवाय होणारे) बीया नसलेले फळ वर्षातून दोनदा बनते. दुसरा ‘स्मर्ना’ प्रकार अतिशय उत्तम फळ तयार करणारा आहे. तिसरा ‘रानटी’ प्रकार आहे. ‘सान पेद्रो’ या चौथ्या प्रकारच्या अंजिराची लागवड कॅलिफोर्नियात केली जाते. याला वर्षांतून दोनदा बहार येतो.

अंजिराचे पोषणमूल्य उच्च प्रकारचे असते. त्यापासून कॅल्शिअम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन (‘अ’ जीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते. इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. अंजीर विरेचक असून त्यात प्रतिऑक्सिडीकारके असतात.

अंजीराचे पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान, इराण, टर्की हे महत्त्वाचे उत्पादक देश आहेत. भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजिरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. सुके अंजीर बरेच दिवस टिकते. ती इराण, अफगाणिस्तान आणि ग्रीसमधून भारतात आयात करण्यात येतात. भारतातही थोड्या प्रमाणावर सुकी अंजिरे बनवितात. सुक्या अंजिरांची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवितात. काजू, संत्री या फळांच्या बर्फीप्रमाणे अंजिराची बर्फीही बाजारात मिळते.

अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात. भारतात सुका मेवा म्हणून अंजीर फारच पसंद केले जातात. अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मेव्यांसोबत मिसळूनही खाल्ले जाते. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सुका मेवा म्हणून गोडपदार्थावर सजावटीसाठीही करता येतो. अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. ताजी अंजीर चवीने सुक्या अन्जीरांपेक्षा वेगळी असतात. यापासून अनेक रोगावर औषधीही तयार केली जातात.

  • रक्तदाब कमी करणे – अंजिराचे नियमित सेवन रक्तदाब कमी करण्यास मदत करते. यातील पोटॅशियममुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत मिळते. यामुळे हृदयात रक्त पुरवठा नियमित व नियंत्रित होतो.
  • वजन संतुलित ठेवणे – आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. त्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्यायोगे मासपेशीं सुदृढ राहतात. उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात.
  • प्रजनन आरोग्यास सुदृढ बनविते – प्राचीन ग्रीक लोकांच्यामते अंजीर हे सर्वात पवित्र आणि प्राकृतिक फळ आहे. तेथे अंजीर प्रेम आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. ते लोक अंजिरास दुधासोबत सेवन करीत होते. अंजिरात झिंक, मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण असते. हे सर्व तत्व आपल्या प्रजनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे प्रजनन तंत्र चांगल्या प्रकारे विकसित होते. किशोर युवतींना पी.एम.एस.च्या समस्यांपासून दूर करण्यासाठी नियमित अंजीर खायचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे कि अंजीरातील प्रतीरोधके महिलांमधील स्तनांच्या कर्करोग आणि हार्मोनल संतुलनात अत्यंत लाभकारी मानले जाते.
  • रक्तातील शर्करेची मात्र नियंत्रित करतो – अंजीरातील बहुगुणी पोटॅशियममुळे रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्केरेची मात्रा नियंत्रित करतो. आपण आपल्या शरीरातील शर्करेची मात्रा तपासून पाहायला पाहिजे. अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
  • हृदयाचे आरोग्य विकसित करतो – हृदयविकार आणि हृदयासंबंधी समस्या वाढवतात अश्या हानिकारक तत्वांना अंजीराच्या सेवनाने दूर करण्यात मदत होते. हृदयातील नलीकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.
  • हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायी – दैनंदिन आहारात शरीरामध्ये खनिजांची 100mg कॅल्शियम गरज असते. त्यासाठी अंजिराचे सेवन लाभदायी आहे. शरीरातील कॅल्शियमची कमतरता अंजीर पूर्ण करते.  त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अंजिराचे सेवन करणे जरुरी आहे.