cardamom

इतका छोट्या वेलदोड्याचे असणारे आरोग्यदायी फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । वेलदोडा हा जरी दिसायला छोटा असला तरी त्याचे आरोग्यदायी फायदे हे खूप असतात. आरोग्याच्या समस्या या दूर करायच्या असतील तर त्यासाठी आयुर्वेदीक उपाय करणे हे जास्त फायदेशीर ठरते . वेलदोडा हा अनेक पदार्थाना चव आणि सुवास येण्यासाटी केला जातो. वेलदोडा याचा वापर हा चहामध्ये सुद्धा केला जातो. त्याचे वेगवेगळे फायदे आहेत . ते कोणते जाणून घेऊया …

नैसर्गिक माऊथफ्रेशनर —

वेलदोड्यामध्ये मध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टरील हे गुण असतात जे माऊस फ्रेशर सारखे आपल्यासाठी उपयोगी असतात. तोंडाची दुर्गंधी हि निघून जाण्यासाठी वेलदोडे हे उपयोगी पडते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर एक वेलची तेज सकाळ- संध्याकाळ खाल्याने तोंडाच्या दुर्गंधी विषयक समस्या कमी होतील.

खोकला आला असेल तर —

जर तुम्हाला सतत खोकला येत असेल तर त्यावेळी वेलदोडा हा तोंडात ठेवा. त्याचे सत्व हे पोटात गेले असता, खोकला हा कमी होण्यास मदत होते. त्यात ज्या काही बिया असतील तर त्या बिया पाण्यात उकळवा . आणि ते पाणी थंड करून आपण त्याचे सेवन करावे . त्यामुळे खोकला आणि अस्थमा या सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो—

वेलदोडा खाल्याने शरीरातील वाईट कोलेस्टोल कमी होते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो आणि त्यामुळे हार्ट ॲटक येण्याची शक्यता सुद्धा कमी होते. हार्ट अटॅक पासून संरक्षण करण्याचे काम हे छोटेसी वेलची करत असते.

त्वचेच्या ऍलर्जी पासून सुटका—

वेलदोडा त्वचेसाठी पण खूप उपयोगी आहे जर तुम्ही रोज नियमितपणे वेलची खाल्ली तर चेहऱ्यावर त्याचा चांगला उपयोग होतो आणि त्वचेविषयक इतर समस्या देखील कमी होतात.

अपचनावर उपयुक्त —

पोटाच्या समस्या साठी वेलची फायदेशीर आहे ॲसिडिटी अपचन या समस्यांपासून त्रस्त असाल तर रोज जेवणानंतर एक वेलची घ्यावी त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो

केस गळणे कमी होते—

जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल तर रोज वेलची खाल्यामुळे हे सगळं थांबतो आणि केस मजबूत राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते. तसेच जर त्याची पावडर हि तेलाच्या मध्ये मिक्स केली .त्या तेलाच्या साहयाने मालिश करा.