| |

वाढत्या प्रदूषणाचा आयुर्मान सरासरीवर गंभीर परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रदूषण हे निरोगी आरोग्याच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे आणि सध्या सर्वत्र प्रदूषणाचे वाढते प्रमाण आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना विषाणूचे सावट तर दुसरीकडे वायू आणि जलप्रदूषणाचा मोठा विळखा महाराष्ट्राला दिवसेंदिवस घट्ट जखडु लागला आहे. परिणामी राज्यातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य सरासरी तीन वर्षांनी घटत चालल्याचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक अशी मैत्री सिटी म्हणून ओळखली जाणारी मोठमोठी शहरे प्रदूषणाच्या निशाण्यावर आहेत. ड्रमायन वाढत्या प्रदूषणाने घटलेली आयुर्मान सरासरी हि अतिसंवेदनशील बाब बनली आहेत.

(WHO- world health organization) जागतिक आरोग्य संघटनेच्या माप दंडानुसार वायुप्रदूषण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोखता आले तर आणि तरच महाराष्ट्रातील या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर ही वाढ मुंबई ३.५ वर्षे, ठाणे ३.४ वर्षे, पुणे ३.७ वर्षे, नागपूर ३.९ वर्षे आणि नाशिक २.८ वर्षे अशी असू शकते. परंतु या मोठमोठ्या शहरातील औद्योगिकरणामुळॆ शिवाय मोठमोठ्या कारखान्यांमुळे जल व वायुप्रदूषण निर्माण झाल्याने येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्यमान अत्यंत वेगाने कमी होत आहे.

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, हवेची गुणवत्ता ६० इतकी म्हणजेच हवेतील पीएम २.५ चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा कमी असावे लागते. मात्र भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महानगर शहरातील कारखान्यांत दरवर्षी जवळ जवळ दोन दशलक्ष टन कोळसा जाळला जातो. यामध्ये मुंबईच्या जवळ असणाऱ्या १३ औद्योगिक क्षेत्रांपैकी ट्रान्स – ठाणे खाडी, तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली या क्षेत्रात ७० टक्के कार्यरत उद्योग समूहांचा समावेश आहे.

हे उद्योग शहरातील वायू प्रदूषणासह अन्य प्रदूषणही वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. उद्योग- कारखान्यांतील सांडपाणी, कोळसा ज्वलन, विविध वायू- केमिकल ज्वलन, प्लास्टिक- रबर ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ- माती, घरगुती ओला- सुका कचऱ्याचे प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत.